पुणे,दि. १४: विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आज लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी घेतली.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक वारस प्रमाणपत्र मिळण्याबाबत व खरेदी खत दस्त करुन मिळणे आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

