पुणे– खुर्चीत बसून शहराचे नियोजन होत नाही. त्यासाठी ग्राऊंडची स्थिती लक्षात घ्यायला हवी. वाहतूक कोंडी होतेय म्हणून फेरीवाल्यांना हटवणे हा त्यावरचा पर्यायच असू शकत नाही. वाहतुकीचे नियोजन करण्यापेक्षा नियमन महत्वाचे आहे.बाजारात येणाऱ्या लोकांना त्यांच्या मोटार सायकलींसाठी पार्किंगची व्यवस्था जवळपास करायला हवी. वाहनधारकांचे लाड बंद करुन स्थानिक प्रशासनाने फेरीवाल्यांचे नियोजन करायला हवे. शहर वाढत असल्याने त्या त्या भागात काही दुकाने सबसिडीच्या धर्तीवर भाजीविक्रेत्यांसाठी द्यायला हवेत. व्यापारी, नागरिक हे शहराचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यासाठी कोणाला किती महत्व द्यायचे याचे तारतम्य ठेवले पाहिजे. पारंपारिक जागा महत्वाच्या आहेत. परंपरेचा अभियान असल्याचे म्हंटले जाते.
वाहनधारकांसाठी भाजी, फळ विक्रेत्यांना हटवायचे हे कसले नियोजन आहे. व्यापारी, नागरिकांसाठी सोयीचे धोरण आवश्यक आहे. वाहतूकीच्या नियोजन ऐवजी नियमन करावे लागेल. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या दुचाकींसाठी काही अंतरावर पार्किंगची व्यवस्था करायला हवी. फेरीवाले संदर्भात निर्णय घेताना घटनास्थळावर जावून सर्वे करावा. व्यापारी, नागरिकांच्या दृष्टीने व्यापारासाठीचा विचार प्राधान्याने व्हावा. वाहनधारकांसाठी व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.अशी मते आता अनेक मान्यवर नागरिकही मांडू लागले आहेत

