सिनेमाचे प्रशिक्षण देणा-या नामांकित शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना अकॅडमीकडून शिष्यवृत्ती दिली जाईल. ही संस्था ना नफा तोट्यावर काम करेल. कान्स आणि ऑस्कर पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा, पायल कपाडिया, रेसुल पुकुट्टी या संस्थेचे सदस्य म्हणून काम पाहतील.
मुंबई, : इंडियन एक्सप्रेस ग्रुप आणि स्क्रीन या प्रकाशन संस्थेने बुधवारी स्क्रीन अकॅडमीची घोषणा केली आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी या अकॅडमीची उभारणी होत नसल्याचे अकॅडमीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. नवोदित कलाकारांना योग्य व्यासपीठ देणे स्क्रीन अकॅडमीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्था भारतीय चित्रपटसृष्टीतील करिअर घडवू इच्छिणा-या नवोदित कलाकारांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यात मदत करेल, त्यांना मार्गदर्शन करेल.
कान्स आणि ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा, पायल कपाडिया, रेसुल पुकुट्टी तसेच ज्येष्ठ पटकथा लेखक अंजुम राजाबली आदी मान्यवर या स्क्रीन अकॅडमीचे सदस्य म्हणून काम पाहतील. येत्या काळात अनेक प्रतिथियश व्यक्ती या संस्थेशी जोडली जाणार आहेत. स्क्रीन अकॅडमी भारतीताल प्रमुख चित्रपट संस्थांसोबत काम करेल. या माध्यमातून भारतातील नव्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मितीचे शिक्षण देता येईल. या शिक्षणातून नवोदितांना आपली कला सादर करण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. या नव्या चेह-यांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असा विश्वास स्क्रीन अकॅडमीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. लोढा फाऊंडेशनचे संस्थापक अभिषेक लोढा यांनी या अकॅडमीच्या उभारणीसाठी आर्थिक साहाय्य केले. स्क्रीन अकॅडमी नवोदित कलाकारांना चित्रपटाशी संबंधित मूलभूत शिक्षण देईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी थेट अर्ज करता येणार नाही. त्यांना यापूर्वी सिनेमाचे प्रशिक्षण देणा-या संस्थांच्यावतीनेशिष्यवृत्तीसाठी शिफारस करावी लागेल. अर्जप्रक्रियेचा तपशील www.screenacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
“योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी स्क्रीन अकॅडमीची उभारणी होत आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रीन अकॅडमीची प्रशंसा केली. मुंबई शहराचे चित्रपटसृष्टीशी अतूट नाते आहे. अगदी गरजेच्या वेळी योग्य ठिकाणी या अकॅडमीची उभारली जात आहे. द इंडियन एक्सप्रेस ग्रुपतर्फे सुरु होणी स्क्रीन अकॅडमी ही संस्था ना-नफा तत्त्वार सुरु होत असल्याचे ऐकून मला अतिशय आनंद झाला. या अकॅडमीतून शिकणारे नवोदित आणि प्रशिक्षित चित्रपटकर्मी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देतील. या नव्या प्रतिभावंत कलाकारांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा वेगाने विकास होईल, ” असा विश्वास मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक आनंद गोएंका यांनी स्क्रीन अकॅडमीच्या उभारणीमागील आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्ही स्क्रीन अकॅडमीच्या माध्यमातून मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्टतेला संस्थात्मक स्वरुप देण्याच्या दिशेने टाकलेले धाडसी पाऊल आहे. या संस्थेतून आम्ही उत्कृष्ट कलाकारांचा सन्मान करु. कलाकारांना आर्थिक मदतीसह आवश्यक संसाधनेही पुरवली जातील.”
लोढा फाऊंडेशनचे संस्थापक अभिषेक लोढा यांनी सांगितले, “आपल्या देशातील कलाक्षेत्राचा विकास साधत आपण इतर देशांवर प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतो. या कामासाठी स्क्रीन अकॅडमीचे कार्य फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपला देश सर्जनशील कलाक्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडी घेऊ शकतो. लोढा फाऊंडेशन २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वतोपरि पाठिंबा देत आहे. चित्रपट आणि सर्जनशी कला हे आपल्या देशाची प्रमुख ताकद आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर आघाडी मिळवून देण्यासाठी स्क्रीन अकॅडमी महत्त्वाची भूमिका बजावेल. या महत्त्वकांक्षी उपक्रमात स्क्रीन अकॅडमीसोबत भागीदारी करताना लोढा फाऊंडेशनला आनंद होत आहे.”
शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योगाचे एकत्रिकरण स्क्रीन अकॅडमी फेलोशिप २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संपूर्ण आर्थिक साहाय्य दिले जाईल. हे पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील फिल्म एण्ड टेलिव्हिजनइन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म एण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि मुंबईतील व्हिललिंग वुड्स इंटरनॅशनल या संस्थांमधून पूर्ण करण्याची संधी असेल. भविष्यात देशभरात आपला विस्तार करण्याची स्क्रीन अकॅडमीची योजना आहे. यातून देशभरातील विविध चित्रपट शाळांचा अकॅडमीत समावेश करता येईल.
स्क्रीन अकॅडमीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ तर मिळेलच शिवाय सिनेसृष्टीतील नामवंत आणि अनुभवी कलाकारांकडून मार्गदर्शन मिळेल. तज्ज्ञांकडून अकॅडमीच्या कामकाजाही पाहिले जाईल. अकॅडमीतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना चित्रपटांशी संबंधित विविध बारकावे शिकवतील, त्यांच्या मार्गदर्शनातून थेट कामकाजाशी संबंधित इंटर्नशिपच्याही संधी उपलब्ध होतील.
फिल्म एण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक धीरज सिंग यांनी स्क्रीनसोबतच्या नव्या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “स्क्रीन हे सिनेमा विषयातील पत्रकारितेतील अत्यंत प्रतिष्ठित नाव आहे. स्क्रीन सोबतच्या भागीदारीतून चांगले परिणाम दिसून येतील. या शिष्यवृत्तीमुळे चांगले विद्यार्थी घडतील तसेच सिनेसृष्टीलाही नवे मूर्त स्वरुप येईल.”
सत्यजित रे इन्स्टिट्यूटचे प्रभारी संचालक समीरन दत्ता यांनी स्क्रीन फेलोशिपचे महत्त्व पटवून दिले. “आपल्याकडे केवळ शहरातूनच नव्हे तर देशाच्या विविध कानाकोप-यांतील लोकांमध्ये उत्तम कल्पना आणि कथानकांची प्रतिभा दडलेली आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील शिक्षणाचा भार पेलता येत नाही. स्क्रीन अकॅडमीची फेलोशिप या विद्यार्थ्यांना सिनेमाचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्यास मदत करेल.”, असे समीरन दत्ता म्हणाले.
व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा मेघना घई पुरी म्हणाल्या, “ व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन बदलते. विद्यार्थ्यांमध्ये दडलेली सर्जनशीलता आणि महत्त्वकांक्षेत आर्थिक अडचणी उभ्या राहतात. परंतु आय.ई.स्क्रीन फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे या आर्थिक अडचणीवरही मात करता येणे शक्य झाले आहे. ही भागीदारी उत्कृष्टता, सर्वसमावेशकता आणि भविष्यातील कलाकार घडवणे या सामायिक मूल्यांवर आधारित आहे.” शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड प्रसिद्ध पटकथा लेखक आणि चित्रपटतज्ज्ञ अंजुम राजाबाली यांच्या देखरेखीखाली कार्यरत समितीकडून केली जाईल. “हा उपक्रम नवोदित तरुण कलाकारांना कला क्षेत्रातील मूलभूत शिक्षण देण्यासाठी आधार देत आहे. चित्रपटी, टीव्ही तसेचओटीटी क्षेत्रातील प्रतिभावान कलाकारांकडून मार्गदर्शन लाभल्याने हे नवोदित कलाकार कायमच कृतज्ञ राहतील. ” या शब्दांत अंजुम राजाबाली यांनी शिष्यवृत्तीचे महत्त्व पटवून दिले. “या शिष्यवृत्तीमुळे लेखन आणि चित्रपट निर्मितीची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. ” अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ”
स्क्रीन अकॅडमीमध्ये सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार, तज्ज्ञ मंडळी आपले अभूतपूर्व योगदान देणार आहे. या प्रतिथियश कलाकारांच्या नावांची यादी खाली नमूद करण्यात आली आहे.
● गुनीत मोंगा – ऑस्कर पुरस्कार विजेता निर्मात्या.
पायल कपाडिया – कान्स ग्रँण्ड प्रिक्स विजेत्या, कपाडिया यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे.
● रेसुल पुकुट्टी – ऑस्कर विजेते ध्वनी डिझायनर
● रॉनी स्क्रूवाला – आरएसव्हीपी फिल्म्सचे संस्थापक आणि अपग्रेड या ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक
● सुभाष घई– ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे संस्थापक
स्क्रीन अकॅडमीमध्ये सहभागी सदस्यांची पूर्ण यादी लवकरच www.screenacademy.org या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल.
उत्कृष्टतेचा नवा आयाम
येत्या काळात स्क्रीन अकॅडमी स्क्रीन पुरस्कारांचेही आयोजन करेल. या पुरस्कारांमध्ये चित्रपटसृष्टीतील कलात्मक सर्जनशीलता, सांस्कृतिक गुणवत्ता आणि तांत्रिक नवकल्पनांचा गौरव केला जाईल. या पुरस्कार निवडीसाठी अकॅडमीच्या सदस्यांची मतदान प्रक्रिया राबवली जाईल. या मतदानातून पुरस्कार निवडीचा अंतिम निर्णय घेताना विश्वासार्हता आणि अनुभव संपन्नता जपली जाईल. स्क्रीन अकॅडमीची उत्कृष्ट गुणवत्ता सांभाळण्याची जबाबदारी पेलण्यासाठी रेसिडेंट क्रिटिक्स पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. यात लॉस एंजेलिस येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधील सिनेमा आणि मिडीया स्टडीज विभागातील सिनेमॅटिक आर्ट्सच्या प्राध्यापिका डॉ. प्रिया जयकुमार, स्क्रीन पुरस्कारांच्या आयोजिका प्रियांका सिन्हा झा, द इंडियन एक्सप्रेसच्या चित्रपट समीक्षिका शुभ्रा गुप्ता, वी आर युवा या डिजीटल प्लॅटफॉर्मचे निखिल तनेजा, प्रसिद्धपटकथा लेखक आणि व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल तसेच एफटीआयआयमधील पटकथा लेथन विभागाचे प्रमुख अंजुम राजाबाली यांचा या रेसिडेंट क्रिटिक्स पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्क्रीन अकॅडमीच्या स्क्रीन पुरस्कारांच्या आयोजिका प्रियांका सिन्हा झा यांनीही आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, “स्क्रीन अकॅडमी भविष्यात चित्रपट, संगीत, रंगभूमी, प्रादेशिक चित्रपट आणि इतर संबंधित कला प्रकारांमधील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातील पारदर्शकता, न्याय आणि विश्वासार्हता निश्चित करण्यासाठी योग्य वर्गवारी, आवश्यक निकष तसेच मूल्यांकन या घटकांवर आधारित प्रणाली तयार केली जाईल.”

