पुणे : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संस्थेतर्फे दरवर्षी सन्मानित करण्यात येत असून यंदाचा आत्मनिर्भर ग्राम जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटर येथे हा कार्यक्रम होईल, अशी माहिती राष्ट्रीय कर्तव्य अभियान चे संयोजक विजय वरुडकर यांनी दिली.
स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ जयंती व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य अभियान या समाजिक समूहाच्या माध्यमातून गेली ९ वर्षे हा कार्यक्रम घेतला जातो. याप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे, रा.स्व.संघ पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, डॉ हेडगेवार स्मारक समिती चे अभय माटे, प्राचार्य फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ.नितीन कुलकर्णी, ग्राम विकास गतीविधी प.महाराष्ट्र संयोजक मधुकर भोसले, सीएसआर हेल्प लाईन च्या संचालक डॉ.तेजस्विनी गोळे, बॉश इंडिया फाउंडेशनचे सुरज जाधव इतर अनेक सीएसआर क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यंदाचा आत्मनिर्भर ग्राम विकास पुरस्कार वाबळेवाडी ता शिरूर, आनंदवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर, कारभारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठाण देवळाली प्रवरा आणि रोहित बलुरे यांना विवेकानंद युवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वावलंबी आत्मनिर्भर ग्राम विषयी पूरक विविध प्रकल्पांचे सादरीकरण तसेच ग्राम विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधी उभारणीची पूर्व तयारी म्हणून तज्ञांचे मार्गदशन उपलब्ध केले जाणार आहे.
कार्यक्रम संयोजक समिती म्हणून ग्रामविकास गतीविधी समूह प.महाराष्ट्र, सेवावर्धनी, सेवा सहयोग, डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्गुसन कॉलेज पुणे, स्पार्क, अर्थ साटेलाईट फाउंडेशन, ग्राम उर्जा, बाबुराव दोंडकर समिती, युवा ध्येय, युनिक एकाडमी, देआसरा फाउंडेशन, शिव सेवा प्रतिष्ठान तळेगाव विविध संस्थाचा सहभाग राहणार आहे. मुख्य पुरस्कार वितरण ६ वाजता होणार असून त्यापूर्वी ४ ते ६ एनजीओ सीएसआर प्रकल्प सादरीकरण होणार आहे.
पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘आत्मनिर्भर ग्राम’ जीवनगौरव पुरस्कार
Date:

