श्री तुळशीबाग मंडळाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम…..
पुणे-गणेश उत्सव कार्यकर्त्यांवर होणारी टीका चुकीची असून त्यांच्यामधील विधायक आणि रचनात्मक कार्याच्या पाठीमागे समाजाने उभे उभारण्याची गरज आहे. या कार्यकर्त्यांच्या सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन इतरांनी सुद्धा त्यांच्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. समाजाच्या वंचित आणि दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यांनी इतरांसमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमांच्या पाठीशी शासन नेहमी खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या शुल्काचा धनादेश मा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ,त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार , उपाध्यक्ष विनायक कदम,कोषाध्यक्षनितीन पंडित, गीतांजली देगावकर, पल्लवी वाघ दिनेश शहा
आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येते ही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट असून या मुलांच्या शिक्षणासाठी महागणपतीचा सदैव आशीर्वाद राहील असे मत मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी व्यक्त केले.
ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमा च्या आयोजनात मंडळाचे विश्वस्त साईनाथ डोंगरे, चकोर सुबंध
प्रतीक इप्ते, गणेश रामलिंग ,अभिजीत वाळके, सौरभ कदम यांनी पुढाकार घेतला
वंचितांचे अश्रू पुसण्यासाठी गणेश मंडळांचा पुढाकार स्तुत्य-ना.चंद्रकांतदादा पाटील
Date:

