मुंबई-शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय गायकवाड यांचे कान टोचले. तसेच अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी सभागृहात म्हटले. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपण त्यांना समज दिल्याचे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, जे खराब झालेले जेवण त्यामुळे लोकांनाही त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा संजय गायकवाड जेवणासाठी गेले तेव्हा त्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण करून त्यांना उलटी झाली आणि रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले. परंतु, आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी कायदेशीर कार्यवाही करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असे मारहाण करणे योग्य नाही आणि हे बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिली आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक तर रोज विविध मुद्द्यावर बोलतच असतात. सरकार देखील त्यांना बोलण्याची संधी देत असते आणि आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार असतो. पण त्यांना सभागृहात बोलण्यापेक्षा त्याच्या बाहेरच बोलण्यात इंटरेस्ट असतो. हे काही असेल तरी लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचे भान ठेऊन वागले पाहिजे.
मला कोणताही पश्चाताप नाही-संजय गायकवाड दरम्यान, कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा मला निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी कॅन्टीन मालकाला समज दिली होती. महाराष्ट्रातील पाच ते दहा हजार लोक रोज या कॅन्टीन मध्ये जेवण करतात. या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.तसेच कॅन्टीन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वीही तक्रार केली होती. दिवसभरात 10 हजार जण या कॅन्टीनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनलाही हे सांगितले होते. मी जे केले ते मला मान्य आहे. मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

