पुणे: सुजल लखारी, निनाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिस-या फेरीत सुजल लखारीने मानस रत्नपारखीवर २१-७, २१-८ अशी, तर निनाद कुलकर्णीने प्रणव वाघवर २१-१६, २१-१२ अशी मात केली. यानंतर ऋषभ देशपांडेने पार्थ देशपांडेचे आव्हान २१-९, २१-७ असे सहज परतवून लावले.
कवीन, देवांश यांचे विजय
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत कवीन पटेलने चिन्मय फणसेचे आव्हान २१-१२, १५-२१, २१-११ असे परतवून लावले. यानंतर देवांश सकपाळने नील गोएलवर २१-७, २१-१० असे, तर रघुवेंद्र यादवने नंदन मुथावर २२-२०, २१-१३ असा विजय मिळवला.१५ वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अभिग्यान सिन्हा याने रियांश चौधरीवर २१-१४, २१-९ असा विजय मिळवला.
निकाल – तिसरी फेरी – ११ वर्षांखालील मुले – हिमांश हरगुनानी वि. वि. अन्वीत राजवाडे २१-१०, २१-१४, कबीर देसाई वि. वि. गौतम साठे २१-१५, २१-१७, बुरहनुद्दीन आगाशी वि. वि. लक्ष्य सिन्हा २१-७, २१-८, अर्जुन तुळपुळे वि. वि. रणवीर सूर्यवंशी २८-२६, २१-१८, आरुष सप्रे वि. वि. शर्वीन मगर २१-१२, २१-१८, वेदांत मोरे वि. वि. मिहिर खरे २१-११, २१-६, अद्वैत फेरे वि. वि. सिद्धांत धामा २१-८, २१-७, ईशान रॉय वि. वि. कबीर कुलकर्णी २१-११, २१-२
१५ वर्षांखालील मुली – सान्वी पाटील वि. वि. साची संचेती २१-११, २१-६, पर्णवी मोहळकर वि. वि. साची पाटील २१-१९, २४-२२, पद्मश्री पिल्लई वि. वि. अरुंधती कंवर २१-१९, २१-१२, मौसम पाटील वि. वि. आर्शी देशमुख २१-४, २१-६, स्वराली थोरवे वि. वि. जिविका कासवा २१-११, २१-१२, शरयू रांजणे वि. वि. रिद्दीमा जोशी २१-२, २१-३, सोयरा शेलार वि. वि. आयुषी काळे १३-२१, २१-१२, २१-५
१५ वर्षांखालील मुले – स्वरित सातपुते वि. वि. अवनीश बांगर २१-१७, २१-१९, अभीक शर्मा वि. वि. वेदांत तांडले २१-७, २१-११, राघवेंद्र यादव वि. वि. आरव राय २१-८, २१-११, आरुष अरोरा वि. वि. अयांश यारागट्टी २०-२२, २१-१८, २१-५,सयाजी शेलार वि. वि. अथर्व काळे १४-२१, २१-११, २१-१३.
१३ वर्षांखालील मुले – मिर शाहझार अली वि. वि. दिविक गर्ग २१-१७, २२-२०, अद्वय देशमुख वि. वि. दिवित मुथा २१-११, २१-१२, एस. सोमजी वि. वि. विहान कोल्हाडे २१-१८, २१-११, शरव जाधव वि. वि. आर्यन नागवडे २१-१९, २१-१७, यश मोरे वि. वि. दियान पारेख २१-१३, २१-१८
१७ वर्षांखालील मुली – वेनिषा कोल्हे वि. वि. आद्या जोशी १८-२१, २१-१६, २१-१४, नाव्या रांका वि. वि. मौसम पाटील २१-१४, २१-११, एस. डाखणे वि. वि. शिवानी मासळेकर २१-१२, २१-११, भक्ती पाटील वि. वि. अहाना जैन २१-७, २१-४, यशस्वी काळे वि. वि. सयुरी थोकल २१-१३, २१-१७, आयुषी मुंडे वि. वि. शिवांजली करडीले २१-१५, २१-१४, स्नेहा भिसे वि. वि. सुखदा लोकापुरे २१-१७, २१-१२, हृदया साळवी वि. वि. रिद्धीमा जोशी २१-११, २१-९.
१७ वर्षांखालील मुले – वरद लांडगे वि. वि. सोहम धामे १६-२१, २१-१४, २४-२२, सुदीप खोराटे वि. वि. ऋग्वेद भोसले २१-१२, २१-१२, अवधूत कदम वि. वि. स्वरीत सातपुते २१-११, २१-१४, श्लोक डागा वि. वि. नितीन एस. २१-१३, २१-१२.

