मुंबई- गेल्या काही वर्षात बालके आणि महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून गेल्या पाच महिन्यांत लहान मुलांवरील अत्याचाराच्या दहा हजारांपेक्षा जास्त घटनांची नोंद झाली तर मार्चपर्यंत तीन महिन्यांत महिला अत्याचाराचे एक हजार १७९ गुन्हे नोंदले गेले आहेत.
विधानसभा सदस्य काशिनाथ दाते, रोहित पवार, भास्कर जाधव, अमिन पटेल आदींनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून राज्यातील वाढती गुन्हेगारी तसेच अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याबाबत सरकारने केलेल्या उपायांबाबत माहिती विचारली होती.त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली
पुणे, खेड, बुलडाणा, अहिल्यानगर आदी ठिकाणी घडलेल्या घटनांचे दाखले देत राज्यात महिला व बाल अत्याचारांचे गुन्हे वाढले असल्याचे निदर्शनास आले असल्याबाबत विचारणा या केली होती.या प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देताना आकडेवारी सादर केली. तसेच हे गुन्हे रोखण्यासाठी महिला सहाय्य कक्ष, दामिनी व निर्भया पथकांची स्थापना, पोलिसांची गस्त वाढवणे, पोलिस ‘काका व दीदीं’मार्फत जनजागृती, पोक्सो व जलदगती न्यायालयांची स्थापना, ११२ हेल्पलाइन अशा उपाययोजना केल्या गेल्याचीही माहिती त्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात झालेल्या महिलांच्या अत्याचाराबाबत विचारलेल्या प्रशाला उत्तर देताना पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील प्रत्येक पोलिस स्थानकामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी गस्त घातली जाते, शाळा / महाविद्यालयांना भेटी देण्यात येतात. तसेच अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्याकरिता गस्त, शोधमोहीम, नाकाबंदी करण्यात येते तसेच छापे घालण्यात येतात, अशी माहिती देण्यात आली.अत्याचाराच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा होण्यासाठी सर्व आयुक्तालय व जिल्ह्यांमध्ये घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मुख्यालयाच्या ठिकाणी महिला साहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.बलात्काराच्या गुन्ह्यांचे ६० दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता ‘ITSSO’ पोर्टलद्वारे देखरेख करण्यात येते. बलात्कार व अॅसिड हल्ल्यातील पीडित व्यक्तींना मनोधैर्य योजनेतंर्गत आर्थिक मदत दिली जाते.

