मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळास विकसक म्हणून नेमून पोलीस गृहनिर्माणास गती द्यावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्रात सर्वत्रच पोलीस वसाहतींची अवस्था चांगली राहिलेली नाही. त्या जुन्या झाल्याने दुरूस्त्यांची कामे खूप करावी लागणार आहेत. काही ठिकाणी नवीन वसाहती बांधाव्या लागणार आहेत. ही समस्या आमदार शिरोळे यांनी सोमवारी विधानसभेत मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळास सर्व महाराष्ट्रासाठी जर विकसक म्हणून नेमले तर, पोलीस हौसिंग ला मोठी गती मिळेल.
गृह विभागाच्या संदर्भात छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील गणेशखिंड रोडवरील विशेष पोलीस महानिरीक्षक मोटर परिवहन विभाग पुणे महानगरपालिकेस हस्तांतरित करणे बाकी आहे,तो करारनामा झाल्यास ट्राफिक चा प्रश्न सुटेल,गृहमंत्र्यांनी हस्तांतरित करण्याचे निर्देश द्यावेत,अशी विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

