Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कात्रज कोंढवा रस्ता,सातारा-मुंबई रस्ता व पुणे-हडपसर -सोलापूर रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन दीड महिन्यात

Date:

पुणे-शहरात वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि सुरळीत वाहतूक असेल हि जबाबदारी महापालिकेची असून त्या दृष्टीने महापालिकेचे अधिकारी आता गतीने काम करतील दरमहा यावर आढावा घेतला जाईल कात्रज कोंढवा रस्ता,सातारा-मुंबई रस्ता व पुणे-हडपसर -सोलापूर रस्ता रुंदीकरणासाठी उर्वरित भूसंपादन दीड महिन्यात केले जाईल असे महापालिका प्रश्नाच्या वतीने आज येथे सांगण्यात आले आहे.

शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने आज मंगळवार दिनांक ८/७/२०२५ रोजी मा. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारीजितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या सक्तीच्या सर्व भूसंपादनाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. सक्तीच्या भूसंपादना संदर्भात पुणे महानगरपालिकेमार्फत पाठविलेल्या विविध विभागांच्या एकूण ४२ प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. यात मुख्यत्वे सर्वाधिक ३४ प्रस्ताव पथ विभागाशी संबंधित असून उर्वरीत ८ प्रस्ताव इतर खाती, उदा. पी.एम.पी.एम.एल., एस.टी., इत्यादी विभागांशी संबंधित होते. प्रत्येक प्रस्तावाच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली व सखोल आढावा घेण्यात आला.
कात्रज कोंढवा रस्ता , सातारा – मुंबई रस्ता व पुणे – हडपसर -सोलापूर रस्ता जोडणाऱ्या शहरातील बहुतांश जड वाहतुक असणाऱ्या रस्त्याच्या तीन टप्प्यात सादर केलेल्या भूसंपादनाची कार्यवाही तातडीने ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यापैकी मिसींग लिंक मधील रस्त्यांचे भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी १५ जुलै ते २५ जुलै २०२५ या कालावधीत मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश भूमी अभिलेख विभागाला देण्यात आले. सनसिटी येथून कर्वेनगर रस्त्याकडे जाणाऱ्या बांधण्यात येणाऱ्या पूलाच्या ॲप्रोच रोडचे भूसंपादनसाठी देखिल तातडीने अधिसूचना निर्गमितकरण्याचे निर्देश देण्यात आले.
यापुढे वाहतुक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने सर्व भूसंपादन प्रकरणे फास्ट ट्रॅक पध्दतीने पूर्ण करण्यासाठी महसूल, म.न.पा. व नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या Task Force गठीत करण्याचे निर्देश देण्यात येवून या टास्क फोर्सद्वारे एकत्रित आठवड्यातून एकदा बैठक घेवून विभागांशी समन्वय ठेवून भूसंपादन प्रकरणे विनाविलंब करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासोबत – महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व एकत्रीकरण व विस्तारीकरण साठीचे भूसंपादन देखिल फास्ट ट्रॅक पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
महिन्यातून एकदा अशी आढावा बैठक आयोजित करण्यात येणार असून निश्चित केलेल्या तारखांनुसार प्रगती होते किंवा नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुक सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्वाची सर्व भूसंपादन प्रकरणे सर्व संबंधित अधिकारी यांनी प्राधान्य देवून भूसंपादन करावे. यासाठी लागणाऱ्या निधीबाबत योग्य नियोजन करून म.न.पा. द्वारे तसेच शासन अनुदानाद्वारे पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे महापालिका आयुक्त यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारची बैठक ही पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त ( विशेष ) ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर, उप आयुक्त ( भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन ) श्रीमती शकुंतला बारवे, तसेच महसूल विभागाकडील Superintendent of Land records (SLR), Deputy SLR, Special Land acquisition Officer क्रमांक १५ व १६ तसेच पुणे महानगरपालिकेचे व महसूल विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...