पुणे- पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष आणि पीएमपीएमएल चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते यांनी मुंख्यामंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे, ‘पं. दिनदयाल उपाध्याय यांचे १९ खंड सार्वजनिक ग्रंथालयांना मोफत दिले त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची चरीत्रे मोफत उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. ते म्हणाले,” महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या विविध प्रकाशनाचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ह्या थोर व्यक्तीमत्वाबद्दल गौरवग्रंथ ,जीवन चरीत्र किंवा कुठल्याही प्रकारचे साहित्या उपलब्ध नसणे ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने आश्चर्यकारक व लाजिरवाणी गोष्ट आहे “
महाराष्ट्र शासनाची विविध प्रकाशने पुणे ,मुंबई ,नागपूर कोल्हापूर या ठिकाणी छपाई होऊन विक्रीसाठी उपलब्ध असतात. फोटो झिंको ,पुणे येथील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ ,जनगणना कार्यालय ,भाषा संचालनालय , महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ ,सामान्य प्रशासनविभाग ,महाराष्ट्र विधान मंडळ ,सचिवालय तसेच इतर अनेक शासकिय प्रकाशनाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या जागतिक दर्जाच्या व्यक्तिमत्वाबद्दल गौरवग्रंथ ,चरीत्रग्रंथ असे कुठलेही साहीत्य उपलब्ध नाही,तरी कृपया शासनाने ज्याप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरीत्र साधने खंड ५२ , महात्मा ज्योतिबा फुले चरीत्र साधने प्रकाशन समिती ,महाराज सयाजीराव गायकवाड चरीत्र साधने प्रकाशन समितिद्वारे अनेक दर्जेदार ग्रंथ प्रकाशित होत असतात.त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चरीत्र साधने समिती व छत्रपती संभाजी महाराज चरीत्र साधने समितीची निर्मिती करून गौरवग्रंथ ,चरीत्र तसेच वेगवेगळ्या राज्यांमधे व परदेशातील विविध संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचे अहीनेक दस्ताऐवज तसेच त्या काळातील महाराष्ट्रात आलेल्या परदेशी आधिकारी व जगप्रसिध्द प्रवाश्यांची अनेक रोचक वर्णने ,आठवणी असे साहीत्य इतर भाषामधे उपलब्ध आहे, त्यांचे मराठी भाषांतर करून ते अनमोल साहीत्य मराठी वाचकांना नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन द्यावे व वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विविध पैलूंचे वाचकांना दर्शन घडवावे ,सध्या बाजारात प्रकाशनांची किंमत खूपच जास्त असल्याने सामान्य जनता ती खरेदी करू शकत नाहीत ,शासनाकडे प्र. न. देशपांडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज व अर्जुन केळुसकरांचे छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन लहान पुस्तके उपलब्ध होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ५२ खंड , महाराजा सयाजीराव गायकवाड ६३ खंड , पं. दिनदयाल उपाध्याय १९ खंड या मानाने दोन लहान पुस्तके ही संख्या कमी आहे पं. दिनदयाल उपाध्याय यांचे १९ खंड ज्याप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांना मोफत दिले त्याप्रमाणे शासकीय ग्रंथालयांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची चरीत्रे मोफत उपलब्ध करून द्यवीत .विशेष म्हणजे भारत सरकारचे प्रकाशन असलेले साहीत्य अकादमी या प्रकाशन संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज याचे लेखक सेतू माधवराव पगडी यांचे एक लहान चरीत्र उपलब्ध आहे तरी कृपया महाराष्ट्र शासनाने त्वरीत छत्रपती शिवाजी महाराज चरीत्र साधने समिती व छत्रपती संभाजी महाराज चरीत्र साधने समिती निर्मिती करावी या निवेदनाचा योग्य विचार करून कार्यवाही व्हावी असेही कपोते यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

