मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागतच व्हायला हवे होते ..पण झाले वेगळेच त्याबद्दल दिलगिरी -अविनाश जाधव यांनी मोर्चात सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगावर दिलगिरीही व्यक्त केली. प्रताप सरनाईक सरकारच्या विरोधात जाऊन मराठी माणसांसोबत उभे टाकले होते. मी सकाळपासूनच त्यांचे स्टेटमेंट ऐकत होतो. एखादा मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठिशी उभा राहत असेल तर त्याचे स्वागतच केले जात असेल. मी प्रताप सरनाईक यांच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी मोर्चाचा आयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
मीरा-भाईंदर मध्ये मराठी माणूस अवघा १२ ते २५ टक्के ..पण तेवढाही पुरून उरेल पोलिसांनी सोडल्यापासून सर्व मोर्चे-करांना भेटण्यासाठी माझा जीव कासावीस झाला होतो. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या आंदोलनाला यश आले असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. पोलिसांनी कितीही दडपशाही केली, तरी एवढ्या मोठ्या संख्येने मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. जर कोणालाच अटक केली नसती आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर किमान 50 हजार लोकांचा हा मोर्चा झाला असता. असे खात्रीने सांगत असल्याचे ते म्हणाले. मराठी माणसासाठी आपण अशीच एकजूट दाखवूया, असे आवाहन देखील जाधव यांनी केले.आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसऱ्याने मोर्चा काढला असता. इथला आमदार नेहमी सांगतो की, मीरा-भाईंदर मध्ये मराठी माणूस 12 – 15% असल्याचे सांगतो. मात्र जेवढे आहेत, तेवढे पुरुन उरण्यासाखे असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. यापुढे आमच्या नादाला लागायचे नाही. मराठी माणूस कोणाचे ऐकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठी माणसाच्या नादाला लागला तर – अविनाश जाधव यांचा इशाराआपण सर्व आजचे आंदोलन इथे थांबवत असल्याची घोषणा अविनाश जाधव यांनी केली. पोलिसांनी दबाव टाकल्यानंतर देखील सर्व मराठी माणसे मोठ्या संख्येने येथे आले आहेत. या आंदोलनातून आपला मराठी माणसाचा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मराठी माणसावर दबाव टाकण्यात येईल, तिथेच मराठी माणूस रस्त्यावर येईल. याच्यापुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल, त्यांनी यापुढे आम्ही एकत्र होणार, हे लक्षात ठेवावे, असा इशारा जाधव यांनी दिला.
मुंबई- आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दीड ते 2 हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला याचवेळी अमराठींना पोलिसांकडून अभय मिळत असल्याच्या आरोपाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली होती. त्यानंतर 11 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी या 11 तासांत काय घडले? याची सविस्तर माहिती दिली आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, पोलिस मंगळवारी भल्या पहाटे 3 च्या सुमारास माझ्या घरी आले. त्यांनी मला झोपेतून उठवले. मला ताब्यात घेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर त्यांना मी त्यांना काही प्रश्न केले. हा मराठी माणसांचा मोर्चा आहे. अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जात आहात. ही कारवाई सरकारच्या विरोधात जाईल असे तुम्हाला वाटत नाही का? त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव असल्याचे सांगितले. त्यानंतर मी तयार होऊन त्यांच्यासोबत गेलो. त्यानंतर त्यांनी मला मीरा भाईंदरला नेले. तेथून खंडणीच्या कार्यालयात नेले गेले. त्यानंतर 2 तासांनी मला पालघरच्या टोकाला नेण्यात आले. असे का केले गेले?
ते पुढे म्हणाले, पोलिसांनी आम्हाला उचलले. त्यानंतर आमच्या जवळपास दीड ते 2 हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. खरे तर याची काहीच गरज नव्हती. व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही तर भूमिपूत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत. मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे. मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती? पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या रुटने नको त्या रुटने मोर्चा काढा. पण पोलिसांनी माझ्याशी किंवा आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी मोर्चाच्या मार्गावर चर्चा केली नाही. पोलिसांकडून चुकीची माहिती दिली जात आहे.
आमच्या मोर्चाला सरकारचा विरोध होता. स्थानिक आमदार व गृहखात्याच्या दबावाखाली आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा भाईंदरमध्ये मागील 7-8 तासांत जे काही झाले ते अवघ्या महाराष्ट्राने व देशाने पाहिले.

