हा टॉवर एकूण 2500 कोटी रु. GDV असलेल्या प्रकल्पाचा एक भाग
पुणे, – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा असलेल्या महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) ने महिंद्रा सिटाडेल येथे नवीन टॉवरच्या उभारणीची घोषणा केली आहे. या टॉवरमध्ये तरुण व्यावसायिक, छोटी कुटुंबे आणि प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी डिझाइन केलेली प्रीमियम 1 बीएचके घरे असतील. हा टॉवर पिंपरी-चिंचवड, पुणे येथील अंदाजे ~9.66-एकर निवासी विकास प्रकल्पाचा एक भाग असून त्याचे एकूण ग्रॉस डेव्हलपमेंट मूल्य (GDV) जवळपास 2500 कोटी रु. आहे. याआधीच्या टप्प्यांना मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर हा टॉवर सादर करण्यात आला असून, उच्च दर्जाच्या नागरी जीवनशैलीसोबतच संत तुकाराम मेट्रो स्थानकाजवळ असल्यामुळे उत्कृष्ट दळणवळण सुविधाही येथे उपलब्ध आहेत.
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (रेसिडेन्शियल) श्री. विमलेन्द्र सिंग म्हणाले, “महिंद्रा सिटाडेलमधील सातत्यपूर्ण मागणी आणि जोरदार विक्रीमुळे पिंपरी-चिंचवड ही उच्च क्षमतेची निवासी मायक्रो-बाजारपेठ आहे यावर आमचा विश्वास दृढ झाला आहे. फेज 1 आणि फेज 2 यामधील बहुतेक घरांची विक्री झाल्यामुळे आता आम्ही खास 1 बीएचके पर्याय सादर करत आहोत. त्यायोगे घर खरेदीदारांच्या विस्तृत गटापर्यंत आमची पोहोच वाढेल. सोयी, कनेक्टिव्हिटी आणि आराम यांचा समतोल साधणाऱ्या दर्जेदार वास्तव्याच्या जागा सादर करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीत आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.”
नवीन सादर करण्यात आलेला टॉवर याच एकात्मिक समुदायाचा भाग असून विचारपूर्वक आखलेल्या पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधा यांचा समावेश आहे. यामध्ये लँडस्केप केलेली हरित क्षेत्रे, क्लबहाऊस, जॉगिंग ट्रॅक, जिम्नेशियम, मल्टीपर्पज कोर्ट्स आणि समर्पित वेलनेस स्पेसेसचा समावेश आहे. याआधीच्या टप्प्यांप्रमाणेच, या टॉवरमधील घरे देखील IGBC Gold pre-certified आहेत आणि यामध्ये उर्जासंवर्धन करणारे लाइटिंग, पाण्याच्या बचतीची यंत्रणा आणि घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था यांसारखी पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये असतील. जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेले हे स्थान शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा केंद्रे आणि मनोरंजन स्थळे यांच्या जवळ असल्यामुळे आणखी आकर्षक बनलेले आहे.

