पुणे, जुलै ०७, २०२५ : शस्त्रक्रियेतील अचूकता आणि नाविन्यपूर्ण रुग्णकेंद्री तंत्रज्ञान यांचा मेळ साधत पुण्यातील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी रुग्णालय, डेक्कन जिमखाना येथील डॉक्टरांनी मोठी किमया साधली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पुण्याच्या ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकावर छोट्या आकाराच्या छेदातून ट्रिपल व्हेसल बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. डॉ. स्मृती हिंदारिया यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी ही शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणा-या त्या पुण्यातील पहिल्या महिला हृदय शल्यचिकित्सक ठरल्या आहेत. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीरावर शस्त्रक्रियेचा छेद कमीत कमी झाल्याने रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन हृदयाचे कार्य पूर्ववत होण्यास मदत झाली.
श्री. रमेश (रुग्णाचे मूळ नाव बदललेले आहे) असे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. रमेश यांना तीन महिन्यांपासून चालताना खूप धाप लागत होती. दैनंदिन कामे करणेही त्यांना अवघड होऊन बसले होते. डॉक्टरांनी रमेश यांची कोरोनरी अँजिओग्राफी तपासणी करून त्यांना ‘ट्रिपल वेसल कोरोनरी आर्टरी डिसीज’ हा गंभीर हृदयाचा आजार झाल्याचे निदान केले. या आजारामुळे त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणा-या तिन्ही मुख्य धमन्यांमध्ये अडथळे आले होते. कोर्डे यांच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाली होती. प्रत्येक माणसाच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता साधारणतः ६० टक्क्यापर्यंत असते. रमेश कोर्डे यांच्या केसमध्ये, त्यांच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता केवळ ३५ टक्क्यापर्यंत खाली घसरली होती. कोर्डे यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल. परंतु रमेश कोर्डे यांनी पारंपरिक पद्धतीने ओपन हार्ट सर्जरी करण्यास नकार दिला.
रुग्णाच्या वय, शारीरिक स्थिती आणि तब्येतीचा विचार करून, सह्याद्रीच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेऐवजी कमी छेदातून (मिनिमली इनव्हेसिव्ह) केली जाणारी आधुनिक बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही पद्धत पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि रुग्णासाठी सोपी ठरते. या नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सल्लागार कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. स्मृती हिंदारिया म्हणाल्या, “या प्रकारच्या बायपास शस्त्रक्रियेत आम्ही छातीच्या मधोमध मोठा छेद देत नाही. त्याऐवजी छातीच्या डाव्या बाजूला फक्त २-३ इंचांचा लहान छेद देऊन (छातीचे हाड न कापता), बरगड्यांमधून शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्त्राव कमी होतो आणि तो लवकर बरा होतो.”
पारंपरिक शस्त्रक्रियेत छातीचे हाड कापण्यासाठी १० ते १२ इंचाचा छेद करावा लागतो. २००-३०० मिली रक्तस्त्राव होतो. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येण्यासाठी ६ ते ८ आठवडे लागतात. हा प्रकार अत्याधुनिक शस्त्रक्रियेत घडत नाही. या नव्या अत्याधुनिक शस्त्रक्रियेचे डॉ. हिंदारिया यांनी फायदे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘या अत्याधुनिक प्रकारात आम्ही छातीवरील छोट्या छेदामधून लांब आणि खास साधनांचा वापर करुन हृदयाजवळील मांसपेशी बाजूला सारत हृदयापर्यंत पोहोचतो. या प्रक्रियेत हाडांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. परिणामी बरेच रुग्ण १० ते १५ दिवसांतच बरे होतात. त्यांना फारशा वेदना होत नाहीत. त्यामुळेच, रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधीही कमी होतो. आणि त्यांना शरीरावरील जखमेचा व्रणदेखील फारसा जाणवत नाही.’’
ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कोर्डे यांना फायदेशीर ठरला. शस्त्रक्रियेनंतर ते केवळ ४८ तास अतिदक्षता विभागात राहिले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्याने पाचव्या दिवशी कोर्डे यांना डिस्चार्ज दिला गेला. रमेश कोर्डे यांच्या प्रकृतीबद्दल शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या टीमने आनंद व्यक्त केला. त्यांनी पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेतील मर्यादेविषयी माहिती दिली. पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेत रुग्णाला ७ ते १० दिवसांपर्यंत रुग्णालयात राहावे लागते. रुग्णाला पूर्णपणे सावरण्यासाठी बराच वेळ लागतो. प्रकृतीत सुधारणा दिसायलाही बराच काळ लागतो, असे टीमच्या वतीने सांगण्यात आले.
ही शस्त्रक्रिया हृदय भूलतज्ज्ञ (कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट) डॉ. शंतनु शास्त्री, हृदय आणि फुफ्फुसाच्या नियंत्रणाची मशीन हाताळणारे पर्फ्युजनिस्ट, अनेक फिजिशियन आणि प्रशिक्षित परिचारिका या अनुभवी टीमने अचूक समन्वयातून यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. शंतनु शास्त्री, कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “हृदयाच्या रक्तवाहिनीवर कमी आकाराचा छेद घेऊन केली जाणारी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी रुग्णाची निवड अत्यंत महत्त्वाची असते. आम्ही शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची सखोल वैद्यकीय तपासणी करतो. यामध्ये कोरोनरी अँजिओग्राफी, 2D इकोकार्डिओग्राफी, हृदयाचा हाय-रिझोल्युशन सिटी स्कॅन आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट यांचा समावेश असतो. या तपासण्या केल्याने रुग्णाच्या हृदयाची संरचना, धमन्यांचे कार्य आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता यांचा स्पष्ट अंदाज येतो. या प्रकारच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची श्वसनप्रक्रिया केवळ एका फुफ्फुसाच्या साहाय्याने सुरु ठेवावी लागते आणि ही प्रक्रिया अत्यंत मोलाची भूमिका बजावते.”
ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अत्यंत परिणामकारक ठरते. मात्र सर्व रुग्णांना ही शस्त्रक्रिया सूचवली जात नाही. मोठे हृदय असलेल्या रुग्णांवर हृदयाच्या रक्तवाहिनीवर कमी आकाराचा छेद घेत करणारी बायपास शस्त्रक्रिया सूचवली जात नाही. हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या तसेच झडप दुरुस्तीसाख्या इतर आवश्यक उपचारांची एकाच वेळी गरज असलेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली जात नाही. ही शस्त्रक्रिया छातीतील बरगड्यांची हाडे नाजूक असलेल्या, पंच्याहत्तरी उलटून गेलेल्या रुग्णांवर देखील केली जात नाही.
डॉ. हिंदारिया यांच्या मते हृदयाच्या रक्तवाहिनीवर कमी आकाराचा छेद घेत करणारी बायपास शस्त्रक्रिया हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. रुग्णांच्या उपचारपद्धतीत ही शस्त्रक्रिया महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या नव्या तंत्रज्ञानाने शरीरातील लहान छेद करुन केल्या जाणा-या शस्त्रक्रियांमध्ये मोठा बदल केला आहे. शिवाय हृदयाशी संबंधित उपचारपद्धतीतील मानसिकतेतही बदल केल्याचे समाधान डॉ. हिंदारिया यांनी व्यक्त केले. या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आता दुर्बिणीतून तसेच रोबोटच्या सहाय्याने (Robotic Assisted) शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
सहयाद्रि हॉस्पिट्ल्सने नेहमीच अत्याधुनिक, अचूक, वेगवान आणि संवेदनशील उपचारपद्धती उपलब्ध करुन देत आधुनिक उपचारपद्धतींना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. रुग्णालयाने हाच यशस्वी दृष्टिकोन बाळगत नव्या आधुनिक शस्त्रक्रियेचा पाया रचला आहे. किमान आकाराचा छेद घेत असलेली हृदय शस्त्रक्रिया करणे हे आता अशक्यप्राय नाही. ही शस्त्रक्रिया आधुनिक काळातील गरज आहे. पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार नसलेल्या किंवा पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी कमकुवत असलेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया आशेचा नवा किरण ठरली आहे.
About Sahyadri Hospital: Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra with 11 hospitals across four cities of Pune, Nashik, Karad and Ahilyanagar. The

