गरीब वाढतायत अन संपत्ती काही मोजक्यांच्याच हातात- नितीन गडकरींनी वेधले वाढत्या आर्थिक विषमतेकडे लक्ष

Date:

नागपूर -देशात आर्थिक विकास होत असला, तरी त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही, हीच खरी चिंतेची बाब आहे, असे वक्तव्य करत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधले आहे.नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, हळूहळू गरीबांची संख्या वाढते आहे, आणि संपत्ती काही मोजक्या श्रीमंतांच्या हाती केंद्रित होते आहे. अशी स्थिती देशासाठी आरोग्यकारक नाही. संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार निर्मिती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा पाया असायला हवा, असेही त्यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, आपण एकाच ठिकाणी संपत्तीचा संचय करतो, आणि त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होतो. हे रोखणे गरजेचे आहे. तर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरण धोरणांचे त्यांनी कौतुक केले, पण अनियंत्रित आर्थिक केंद्रीकरणावर त्यांनी थेट टीका केली.

भारताच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 52-54 टक्के, उत्पादन क्षेत्राचा 22-24 टक्के, तर 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असूनही, तिचे योगदान केवळ 12 टक्क्यांवरच मर्यादित आहे, याकडे गडकरींनी लक्ष वेधले. ही असमानता दूर करणे आपल्या धोरणांचे केंद्रबिंदू असायला हवे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

रस्ते बांधकाम संदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले की, माझ्या विभागाकडे निधीची कमतरता नाही. उलट प्रकल्प पूर्ण करणाऱ्या सक्षम लोकांची गरज आहे. सध्या टोलमधून 55 हजार कोटींचे उत्पन्न असून, पुढील दोन वर्षांत हे उत्पन्न 1.40 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे उत्पन्न चलनीकरण केल्यास 12 लाख कोटींच्या गुंतवणुकीची क्षमता निर्माण होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

चार्टर्ड अकाउंटंट्सच्या भूमिकेबाबतही नितीन गडकरी म्हणाले की, सीए हे केवळ कर सल्लागार नसून, अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन ठरू शकतात. त्यांचा वापर केवळ आयकर आणि जीएसटीपुरता मर्यादित असता कामा नये.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...