पुणे | प्रतिनिधी
‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न झाला. सतीश मिसाळ फाउंडेशनच्या वतीने यावेळी भाविकांसाठी २१ हजार किलो खिचडीचे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. तसेच नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ व दीपक मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे संयोजन अजय डहाळे, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, नलिनी गोसावी, शरद मोरे आणि प्रसन्न जगताप यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या सेवेसाठी आणि अध्यात्मिक वातावरणासाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ च्या गजरात आषाढी एकादशीचा आनंद लुटला.

