व्यावसायिक सुशील केडियांची माफी—–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया (Sushil Kedia)यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. नंतर केडिया यांनी एक्सवर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला.मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर एक दिवस मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत मी मराठी (Marathi) बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे थेट आव्हान राज ठाकरे यांना दिले होते.या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी वरळी येथील डोममध्ये मेळाव्यासाठी जात असताना केडिया यांच्या कार्यालयावर नारळ आणि दगडफेक केली.या घटनेत कार्यालयाच्या काचा फुटल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना असा धडा शिकवला जाईल अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली असून सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. पोलिसांनी तणाव वाढू नये म्हणून तत्काळ हस्तक्षेप करत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यानंतर केडिया यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या वक्तव्याची माफी मागितली. त्यात त्यांनी म्हटले, मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांचे कार्यालय फोडले आहे. केडिया यांनी परवा एका पोस्टद्वारे मी मराठी बोलणार नाही असे ठणकावून सांगितले होते. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिले होते. त्यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर ‘नारळ’फेक केली. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे मुंबईतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनसे व ठाकरे गटाने या निर्णयाला कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला केलेली मारहाण व त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे स्थिती अधिकच चिघळली आहे. यामुळे संतापलेल्या सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उपरोक्त शब्दांत आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी त्यांचे कार्यालय फोडले आहे.
आज वरळी येथील डोम येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळाव्याला निघालेल्या मनसैनिकांनी सकाळीच सुशील केडिया यांचे कार्यालय गाठून त्याच्यावर ‘नारळ’फेक केली. या घटनेत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे.
काय म्हणाले होते सुशील केडिया?
मी मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहतो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. पण तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. राज ठाकरे काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. गंभीर म्हणजे केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी आज त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक व केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणूनही ओळख आहे. त्यांची कंपनी गुंतवणूक व बाजारपेठेतील विश्लेषणाचे काम करते. मागील 25 वर्षांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनाच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. सुशील केडिया अनेक बिझनेस चॅनेलवर पाहुणे म्हणून जातात. तिथे ते शेअर बाजार आणि गुंतवणूक विषयावर अधिकारवाणीने बोलतात. मुंबईत राहणाऱ्या केडियांना हिंदी, इंग्रजीशिवाय बंगाली, गुजराती, मराठी भाषा अवगत आहे.
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. हा केडीया नाही.. कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. …आणि हो, केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल, असे ते म्हणाले.

