Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विश्वराज हॉस्पीटलमध्ये पुण्यातील प्रथमच ‘ट्रान्सकॅथेटर फॉन्टन कम्प्लिशन’ शस्त्रक्रिया यशस्वी

Date:

पुणे, दि.४ :  बारामती येथील १८ वर्षीय योगेश शिंदेला थोडे चालल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत होता. तो इतर मुलांसारखा खेळू शकत नव्हता. घरातील लोक चिंतेत होते. हळू हळू त्याचा आजार वाढत चालला होता. जेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ही शस्त्रक्रिया करायची असेल तर लाखो रुपये लागत होते. त्याची परिस्थिती गरीबीची असल्यामुळे हा खर्च ते करू शकत नव्हते. परंतू लोणी-काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलने ‘ट्रान्सकॅथेटर फॉन्टन कम्प्लिशन’ या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विनाचिरफाड करता निःशुल्क शस्त्रक्रिया केली.
१० हजार बालकांमध्ये एखादयालाच असणार्‍या हृदयाच्या आजाराला दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. योगेश बाळू शिंदे हा त्यापैकीच एक आहे. त्याच्यावर पारंपरिक पद्धतीऐवजी आम्ही एका अत्याधुनिक व कमी धोकादायक प्रक्रियेचा अवलंब करून फॉन्टन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्णपणे ट्रान्सकॅथेटर मार्गाने यशस्वी केला. त्यामुळे उघड्या छातीची शस्त्रक्रिया टाळता आली. पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांचा डिस्चार्जचा कालावधी लागतो. परंतू आम्ही रुग्ण केवळ तीन दिवसांतच डिस्चार्ज दिला. अशी माहिती लोणी-काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिषकुमार बनपुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कातकडे, वैद्यकीय संचालक डॉ. सुजितकुमार एम., कार्डिओलॉजिस्ट डॉ. सूरज इंगोले, बालरोग विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत सहारे, आयसीयू विभाग प्रमुख डॉ. विजय खंडाळे, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शेंडगे हे उपस्थित होते.
डॉ.बनपुरकर म्हणाले, ही एक अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, मात्र आम्ही कॅथेटर-आधारित तंत्र वापरून रुग्णाचा धोका, शारीरिक आघात आणि रिकव्हरीचा कालावधी फारच कमी केला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ९६% पर्यंत वाढले आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा दिसून आली.
डॉ. सुजितकुमार एम. म्हणाले, योगेश बाळू शिंदे (वय १८) हा नुकत्याच पार पडलेल्या एका वैद्यकीय शिबिरात उपस्थित राहिला, तेव्हा त्याला तीव्र दम लागणे आणि केवळ ७०% ऑक्सिजन सॅच्युरेशन अशी स्थिती होती. त्याच्या हृदयात ट्रायकसपिड अ‍ॅट्रेशिया, डबल आउटलेट राईट व्हेंट्रिकल (DORV), व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) आणि पल्मोनरी स्टेनोसिस (PS) अशा अनेक जन्मजात दोषांची चिकित्सा झाली होती. २०१८ मध्ये बायडायरेक्शनल ग्लेन शंट व फॉन्टन प्रिपरेशन शस्त्रक्रिया करून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता.
पेशंटची आई सुनीता शिंदे म्हणाल्या, २०१८ साली आर्थिक मदतीच्या जोरावर पहिली शस्त्रक्रिया झाली, आणि नुकत्याच एका वैद्यकीय शिबिरात विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी झालेल्या भेटीनंतर दुसरी टप्प्यातील शस्त्रक्रिया एका नव्या आणि कमी जोखमीच्या पद्धतीने मोफत करण्यात आली. त्यामुळे माझ्या मुलाला नवीन जीवन जगण्याची उमेद मिळाली. यासाठी मी विश्वराज हॉस्पीटल व डॉक्टरांचे आभार मानते.
ही शस्त्रक्रिया  IPF योजनेअंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही अत्याधुनिक उपचार घेण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, हॉस्पिटलने आतापर्यंत सुमारे ५० बालहृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.
या यशामुळे भविष्यात अधिक रूग्णांसाठी ट्रान्सकॅथेटर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सोमवारपासून तर कॉंग्रेस पक्षाकडून मंगळवार पासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार

पुणे -महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज...

मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार महापालिका निवडणूक : मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

‘पुणेकरांशी संवाद साधून निवडणुकीसाठी वचननामा तयार करणार’-मुरलीधर मोहोळ यांच्या...

सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रांचा एकत्र डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई- नेहमी एकमेकींच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या आणि...