अकरावी नापास, रेक्टल प्रोलॅप्सचे निदान होणे ते आयआयटी रुरकीपर्यंतचा प्रवास;
कल्याण:
कल्याण येथील 19 वर्षीय विद्यार्थी हर्ष गुप्ताने हलाखीची आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक अडथळे आणि आजारपणाला
तोंड देत प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रुरकी येथे प्रवेश मिळवला आहे. त्याचा हा प्रवास
परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो किती सक्षम आहे, हे दाखवतोच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील प्रतिभा पुढे
आणण्यात कोटा येथील मोशन एज्युकेशनने बजावलेली परिवर्तनकारी भूमिका देखील प्रामुख्याने सांगतो.
हर्ष हा सामान्य कुटुंबातील असून त्याच्या वडिलांची पाणीपुरीची गाडी आहे. त्यांचे सहा जणांचे कुटुंब ठाणे
जिल्ह्यातील कल्याण येथे एका लहान दोन खोल्यांच्या चाळीत राहते. मर्यादित साधने आणि स्पर्धा परीक्षांची फारशी
माहिती नसल्याने, कोविड-19 च्या काळात दहावी पास झाल्यानंतरच हर्षला आयआयटीबद्दल पहिल्यांदा माहिती
मिळाली. पण, त्याने मोशन एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला होता झाला तोवर अकरावीचा अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण
झाला होता. त्यामुळे तो हाच अभ्यास पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होता.
एवढे प्रयत्न करूनही तो अकरावीच्या परीक्षेत नापास झाला, ज्यामुळे नातेवाईकांकडून त्याच्यावर टीका झालीच पण
कुटुंबाने देखील त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, मोशन एज्युकेशन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्याला
पुन्हा विश्वास देत, त्याच्यातील आत्मविश्वास जागवत शैक्षणिकदृष्ट्या त्याला लागेल ती मदत आणि वैयक्तिक
मार्गदर्शन केले.
अभ्यास जोमाने सुरू असतानाच, हर्षला रेक्टल प्रोलॅप्स, हा एक त्रासदायक आणि वारंवार उद्भवणारा आजार
असल्याचे निदान झाले. उपचारांसाठी सातत्याने रुग्णालयात जावे लागत असल्याने याचा परिणाम त्याच्या
अभ्यासावर झाला. आजारपणामुळे त्याचा विश्रांतीचा कालावधी देखील वाढला. हर्षसाठी अत्यंत अवघड असलेल्या
या काळातही, मोशनच्या प्राध्यापकांनी, विशेषतः जेईई विभागाचे प्रमुख आरआरडी सरांनी त्याला सातत्याने
भावनिक आधार दिला आणि शैक्षणिक मार्गदर्शन केले.
या सगळ्यावर मात करून तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असतानाच मोठ्या परीक्षांपूर्वी त्याला पुन्हा एकदा एका
संकटाला तोंड द्यावे लागले. परीक्षा तोंडावर असतानाच त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे निधन झाले. तरीही हर्षने
अभ्यासावरील आपले लक्ष ढळू दिले नाही. एका वर्षाचा ड्रॉप घेऊन पुन्हा मोशन एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतल्यानंतर,
त्याने जेईई ऍडव्हान्समध्ये दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवले आणि आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश मिळवला. विशेष
म्हणजे, त्याने जेईई मेनमध्येही 98.9 टक्के गुण पटकावले होते.
“आयुष्यात मी अशा काही प्रसंगांना तोंड दिले जेव्हा मी शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकलो होतो. पण मोशनने
कधीही माझा हात सोडला नाही. कित्येकदा तर मी आत्मविश्वास गमावला तरीही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला,”
असे हर्ष सांगतो. मोशन एज्युकेशनच्या विद्यार्थी-प्रथम दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तर समाजाच्या सर्व
स्तरातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर सगळ्या संकटात पाठिंबा देण्याच्या मोशनच्या ध्येयाचे हे
एक प्रभावी उदाहरण आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षक एन.व्ही. सर (नितीन विजय) यांच्या नेतृत्वाखाली, मोशन एज्युकेशनने पुन्हा एकदा स्पर्धात्मक
परीक्षेच्या क्षेत्रातील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे आणि जेईई ऍडव्हान्स्ड 2025 मध्ये उत्कृष्ट निकाल आणले आहेत.
शैक्षणिक उत्कृष्टता दाखवत, मोशनच्या 6 विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम 100 मध्ये स्थान मिळवले, 23 विद्यार्थ्यांनी टॉप
500 मध्ये आणि 47 विद्यार्थ्यांनी टॉप 1000 मध्ये स्थान मिळवले. संस्थेची शिकवण्याची
पद्धत, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी-प्रथम दृष्टिकोनाचे हे एक शक्तिशाली प्रमाण आहे.
परीक्षेला बसलेल्या मोशनच्या 6,332 विद्यार्थ्यांपैकी 3,231 विद्यार्थी पात्र ठरले. ज्यामुळे संस्थेचे पात्रता गुणोत्तर
51.02% होते – जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. राष्ट्रीय आकडेवारीशी याची तुलना केली तर : अंदाजे 1.9 लाख
विद्यार्थ्यांपैकी फक्त 45,000 (23.68%) विद्यार्थी पात्र ठरले.
हा उत्कृष्ट निकाल मोशन एज्युकेशनच्या मजबूत शैक्षणिक परिसंस्थेवर आणि कोचिंग उद्योगात नवीन मानके स्थापित
करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.

