मुंबई- टीव्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे कांदिवली परिसर चांगलाच हादरला आहे. मुलाने ट्यूशनला जाण्यास नकार दिल्यानंतर देखील आईने त्याला ट्यूशनला जाण्यास सांगितल्याने सदरील मुलाने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
किरकोळ कारणामुळे अनेकदा आत्महत्यांच्या घटना या आधी देखील समोर आल्या आहेत. त्यातच आता मुलाला ट्यूशनला जाण्यास आईने जबरदस्ती केल्याने मुलगा आणि आई मध्ये वाद झाला होता. त्यामुळे मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या 57 व्या मजल्यावरून खाली उडी टाकली. इतक्या उंचीवरून खाली पडल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करणारा मुलगा हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गुजराती सिरियलमध्ये काम करत होती. त्यामुळे कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? त्याला उडी मारताना कोणी पाहिले का? या प्रश्नांची उत्तर पोलिस तपासत आहेत. मुलाने रागाच्या भरात सदरील कृत्य केले की, आणखी काही नवीन माहिती समोर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

