Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

Date:

मुंबई-महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यासह भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत.यावेळी आशिष शेलार म्हणाले, रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नावाने बारावे अध्यक्ष असतील. मात्र ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही.मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद अशा विविध स्तरांवरील निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणून भाजपला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आता चव्हाण यांच्यावर असणार आहे.

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅटट्रीक पूर्ण केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला. ओबीसी चेहरा असणाऱ्या बावनकुळेंच्या नेतृत्वात पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. बावनकुळे यांनी भाजपची स्थानिक पातळीवरील रचना मजबूत केली. 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य व 5 लाख सक्रिय कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवले. बूथ स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका आणि नियुक्त्यांचे नियोजन केले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या असल्या तरी, बावनकुळेंनी त्यातून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत बूथस्तरीय व्यवस्थापन करून भाजपला यश मिळवून दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या...

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव आयसीयूमध्ये:शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती

पुणे-ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे...

खराडीतील ‘ए वन स्पा’वर छापा:वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ५ महिलांची सुटका

पुणे - खराडीत असलेल्या 'ए वन स्पा' सेंटरवर पोलिसांनी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...