नवी दिल्ली, 1 जुलै 2025
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन आठ वर्षे पूर्ण होत असून ही एक ऐतिहासिक आर्थिक सुधारणा म्हणून नावारूपास आली आहे, असें पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जीएसटीने भारताच्या आर्थिक परिदृश्याला नवा आकार दिला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे की,
जीएसटी लागू होऊन आठ वर्षे झाली आहेत. ही एक ऐतिहासिक सुधारणा ठरली असून तिने भारताच्या आर्थिक परिदृश्याला नवा आकार दिला आहे,
अनुपालन भार कमी करून विशेषतः लघु व मध्यम उद्योगांसाठी जीएसटीने व्यवसाय सुलभतेत लक्षणीय सुधारणा केली आहे. भारताच्या बाजारपेठेला एकात्मिक करण्याच्या या प्रवासात राज्यांना समान भागीदार बनवून खऱ्या सहकारी संघवादाला चालना देत जीएसटीने आर्थिक विकासासाठी एक शक्तिशाली इंजिन म्हणून देखील काम केले आहे.

