माजी मंत्री राजेंद्र मुळूक यांचे निलंबन मागे–पुण्यातून आबा बागुलांचे निलंबन मागे घेण्याची शक्यता
मुंबई- विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री. राजेंद्र मुळूक यांचे निलंबन आज औपचारिकरित्या मागे घेण्यात आले.यामुळे पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून बंडखोरी करणारे आबा बागुल यांचे निलंबन देखील मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुळूक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.
याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री. बी. एम. संदीप आणि श्री. कुणाल चौधरी हेही उपस्थित होते.

