पुणे- नागरिकांना नेमक्या प्रतिनिधीला उत्तरदायी ठरवता येते,दोन किंवा अधिक सदस्य असलेल्या मतदारसंघांमध्ये मतदारांचा गोंधळ उडतो. आणि उमेदवारापेक्षा राजकीय पक्षाला महत्व प्राप्त होते, राजकीय पक्षाने थोपविलेले उमेदवार जनतेला स्वीकारणे भाग पडते अशा विविध कारणांनी बहुसदस्य प्रभाग पद्धतीला विरोध होत असला तरीही लोकशाही आणि संविधान या दृष्टीने देखील बहुसदस्य प्रभाग पद्धती असंवैधानिकच आहे असा दावा आज आप चे विजय कुंभार यांनी केला आहे.
कुंभार म्हणाले कि,’ लोक विचारतात प्रभाग पद्धती असंविधानिक कशी ? तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगतो कि, सुरुवातीला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून दोन-सदस्यीय मतदारसंघ प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष अनुभवातून असे लक्षात आले की, ही प्रणाली समाधानकारकरीत्या कार्यरत नव्हती. अनुसूचित जाती व जमातींतील सदस्यांची एकंदर भूमिका ही लहान, एक-सदस्यीय मतदारसंघांनाच प्राधान्य देणारी होती, कारण अशा मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा खर्च व त्रास तुलनेने कमी असतो.
तसेच, दोन-सदस्यीय मतदारसंघ हे प्रशासनाच्या दृष्टीनेही अव्यवस्थित व क्लिष्ट ठरले होते. म्हणून, प्रत्येक दोन-सदस्यीय मतदारसंघाचे विभाजन करून १९६१ साली दोन स्वतंत्र एक-सदस्यीय मतदारसंघ तयार करण्यात आले.बहुसदस्य प्रणाली अगदी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी लागू होती. परंतु ती निष्फळ ठरली त्यामुळे
१.SC/ST प्रतिनिधींनी लहान, स्पष्ट, एक-सदस्यीय मतदारसंघांना पसंती दिली. खर्च व प्रचार कमी.
२. बहुसदस्यीय प्रणालीमधे मतदान, मतमोजणी व निकाल प्रक्रिया गुंतागुंतीची झाली होती.
३.एकसमान पक्षाचे दोघेच निवडले जात, दोन जागा असूनही विविधता निर्माण झाली नाही.
४.एक-सदस्यीय प्रणालीने निवडणूक स्पष्ट व उत्तरदायित्वपूर्ण बनते.
या बाबींचा विचार करून संविधानात १९६१ साली सुधारणा करण्यात आली आणि हेच तत्व स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू होतं.
त्याच प्रमाणे “एक मतदार – एक मत” या तत्त्वामुळे.
- प्रत्येक मतदाराचे मत समान असते.
- कुठलाही वर्ग, जाती, धर्म किंवा प्रदेशाला जास्त वा कमी महत्त्व दिले जात नाही.
- सर्व नागरिकांना समान अधिकार मिळतात.
- निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते.
- मतदार फक्त एका उमेदवाराला मत देतो, त्यामुळे मतदान आणि मतमोजणी सोपे आणि स्पष्ट असते.
- एका मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडला जातो.
- नागरिकांना नेमक्या प्रतिनिधीला उत्तरदायी ठरवता येते.
- दोन किंवा अधिक सदस्य असलेल्या मतदारसंघांमध्ये मतदारांचा गोंधळ उडतो.
असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

