हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन

Date:

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उद्रेक…!!

पुणे, दि. 30 जून २०२५ –
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार, बेशिस्त व अकार्यक्षम कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारींचे कारण ठरत असून याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले. हडपसर परिसरातील संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. विशेष बाब म्हणजे, सत्ताधारी पक्षातील प्रमुख स्थान असलेल्या शिवसेनेनेच या गैरकारभाराच्या विरोधात उघडपणे आवाज उठवल्याने या आंदोलनाला विशेष राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागरिकांना मूलभूत सेवा वेळेवर न मिळणे,पिण्याच्या पाण्यात दूषित पाण्याचा पुरवठा,रस्त्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणाचे साम्राज्य,क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता, बायोमेट्रिक यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद,अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत,नागरी समस्या सोडविण्यात प्रशासनाची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत या सर्व मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांनी एकत्र येत ठोस आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान नागरिकांनी देखील आपले अनुभव आणि त्रास मीडिया समोर व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला टी स्टॉल , फ्रुट स्टॉल थेट क्षेत्रीय कार्यालयात आणून सर्वांसमोर ठिय्या मांडल्याने काही काळ क्षेत्रीय कार्यालयाला अतिक्रमित भाजी मंडईचे स्वरूप आले होते

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हडपसर परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा त्रास सहन करत आहेत. आम्ही वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आजचा संताप ओघातच होता. पिण्याच्या पाण्यातील दूषितता, रस्त्यांवरील अतिक्रमण, आणि अधिकारी वर्गाची बेजबाबदारी यामुळे संपूर्ण यंत्रणा ढिम्म झाली आहे. जर येत्या ८ दिवसांत प्रशासनाने सुस्थितीत कामकाज सुरू केलं नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन अधिक उग्र करेल व प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम इशारा भानगिरे यांनी दिला.

हडपसर-मुंढवा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाही तर अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना पुकारेल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्न

महाराष्ट्रातून ७० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती ; एप्रिल २०२६ मध्ये...

पुणे मेट्रोमध्ये सुलभ प्रवासासाठी एनपीसीआयने एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने ‘रुपे ऑन-द-गो’ कार्ड सादर केले

महा मेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) आणि एचडीएफसी बँक यांच्‍यामधील सहयोगामुळे लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार पुणे ,: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने महा मेट्रो आणि पुणे मेट्रोसाठी विशेष अ‍ॅक्वायरर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो (ओटीजी) कार्ड स्वीकारण्याची सुविधा सुरू केल्याची आज घोषणा केली. या उपक्रमामुळे प्रवासी त्यांच्या विद्यमान रुपे ऑन-द-गो कार्डचा वापर करून पुणे मेट्रोच्या सर्व कार्यरत स्थानकांवर प्रवास करू शकतात. संपर्करहित आणि इंटरऑपरेबल पेमेंट सोल्यूशन्सद्वारे ही डिजिटल तिकीट यंत्रणा विनासायास आणि सुलभ अनुभव देते. ही सुविधा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. कागदी तिकीट, मोबाइल क्‍यूआर तिकीट, तसेच एचडीएफसी बँक वन पुणे एनसीएमसी रुपे कार्डद्वारे प्रवाशांना सुविधा देणारी पुणे मेट्रो आता ओपन-लूप रुपे ऑन-द-गो स्वीकारण्याच्या सुविधेमुळे अधिक सुधारित प्रवास अनुभव देत आहे. या उपक्रमामुळे कोणतेही विद्यमान किंवा नवीन रुपे ऑन-द-गो कार्ड वापरून अ‍ॅक्वा आणि पर्पल मार्गिकांवरील सर्व २९ कार्यरत स्थानकांवर ‘टॅप अँड ट्रॅव्हल’ करता येणार आहे. ही प्रगती दैनंदिन प्रवाशांना एकसंध, सोयीस्कर आणि विनासायास प्रवासाची सुविधा देणार आहे. यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवासी संपूर्ण नेटवर्कमध्ये एकाच कार्डचा वापर करू शकतील. प्रत्येक प्रवासासाठी किंवा वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांसाठी स्वतंत्र तिकीट खरेदी करण्याची गरज न राहिल्याने प्रवास अधिक सोपा होईल. रुपे ऑन-द-गो कार्ड विविध बस आणि मेट्रो सेवांमध्ये इंटरऑपरेबिलिटीला पाठबळ देते, तसेच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही प्रदान करते, ज्यामुळे कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही प्रवाशांना कोणताही अडथळा येणार नाही. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. श्रवण हार्डीकर, आयएएस म्हणाले, “पुणे मेट्रोसाठी एनसीएमसी कार्ड इंटरऑपरेबिलिटीची सुरुवात हा खरोखरच एक परिवर्तनकारी टप्पा आहे. माननीय पंतप्रधानांच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम प्रवाशांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करणार आहे. स्वयंचलित भाडे सवलतींसह सुलभ ‘पे-अ‍ॅज-यू-गो’ अनुभव देऊन आम्ही सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, परवडणारी आणि प्रवासी-अनुकूल बनवत आहोत. या महत्त्वपूर्ण यशासाठी मी संपूर्ण पुणे मेट्रो टीमचे, आमचे भागीदार एचडीएफसी बँक आणि पेक्राफ्ट यांचे, तसेच हे यश शक्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्‍या शहरासाठी आणि देशासाठी विनासायास, स्मार्ट आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.” एनपीसीआयच्या कार्यकारी संचालिका (ग्रोथ) सोहिनी राजोला म्हणाल्या: “पुणे मेट्रोमध्ये 'रुपे ऑन-द-गो' सुरू करणे हे भारतातील शहरी गतिशीलता सुधारण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी एमआयेएचयूए, महा मेट्रो आणि एचडीएफसी बँकेसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. याद्वारे आम्ही डिजिटल पेमेंटची व्याप्‍ती वाढवून त्‍याला सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहोत.” एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंग चॅनेल प्रमुख श्री. राजनिश परमानंद प्रभू म्हणाले: “आम्ही ग्राहकांना सुलभ, सर्वोत्तम आणि आधुनिक प्लॅटफॉर्मवर आधारित डिजिटल अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. रुपे ऑन-द-गो कार्डमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्‍यासह प्रवासाचा दर्जाही सुधारेल. पुणे मेट्रोकरिता रूपे ऑन-द-गो कार्डसाठी पेमेंट पार्टनर म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही एनपीसीआय, एमओएचयूए आणि महा मेट्रोचे आभारी आहोत.” पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो स्वीकारण्यामुळे देशभरातील विविध मेट्रो आणि बस नेटवर्कमध्ये एनसीएमसीचा व्यापक अवलंब वाढण्यास मदत होत आहे. यामुळे भारताचा स्मार्ट मोबिलिटी पायाभूत सुविधांकडे होणारा प्रवास वेगाने पुढे जात असून प्रवाशांना सोपा आणि सातत्यपूर्ण प्रवास अनुभव मिळत आहे. वापरकर्ते केवळ पुण्यातच नव्हे, तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद आणि कानपूर यांसारख्या शहरांतील मेट्रो सेवांमध्ये, तसेच मुंबई (B.E.S.T), गुवाहाटी, हरियाणा, जम्मू, श्रीनगर, हिमाचल आणि औरंगाबाद येथील बस सेवांमध्येही रुपे ऑन-द-गो कार्डचा लाभ घेऊ शकतात. रुपे एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी वापरकर्ते सहभागी बँका, मेट्रो स्थानके किंवा नियुक्त कार्यालयांना भेट देऊ शकतात आणि त्यांच्या सुलभ प्रवासाच्या सुरुवातीसाठी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्ट भूमिपूजन सोहळा संपन्न!

पुणे-येथील महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी...