Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिंद्रातर्फे 11.19 लाख रु. (एक्स-शोरूम) किमतीत बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर

Date:

मुंबई, 30th जून 2025भारतातील नंबर पिकअप ब्रँड बोलेरो पिक-अपचे निर्माते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपली संपूर्णपणे नविन बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर केली असून लहान व्यावसायिक वाहन विभागात एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. 11.19 लाख रु. (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण पिकअपमध्ये 1.85 टनची सर्वाधिक पेलोड क्षमता आहेत्यामुळे ग्राहकांना अतुलनीय क्षमता आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळते.

एक मजबूत 2.5-लिटर टर्बोचार्ज्ड CNG इंजिनद्वारे संचालित बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG 61 kW आणि श्रेणीत सर्वोत्तम 220 Nm टॉर्क @ 1,200–2,200 rpm वितरीत करतेजे कठीण भार परिस्थितीतही अतुलनीय कार्यक्षमता सुनिश्चित करते. विशेषतः लांब पल्ल्याच्या कामकाजासाठी डिझाइन करण्यात आलेले हे वाहन एक सिंगल CNG पूर्ण भरल्यावर 400 किमी पर्यंतचा प्रभावी प्रवास करू शकते. यामध्ये 180-लिटरची टाकी क्षमता आहे. हे वाहन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पॉवर स्टीअरिंगसह सुसज्ज असून शहरी आणि निमशहरी परिसरात सहजपणे चालवता येते.

बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG हे महिंद्राचे पहिले CNG पिकअप असूनयामध्ये प्रगत iMAXX टेलिमॅटिक्स सोल्यूशनद्वारे समर्थित आधुनिक कनेक्टेड तंत्रज्ञान आहे. ही नाविन्यपूर्ण प्रणाली रिअल-टाईम वाहन माहिती पुरवितेत्यामुळे जास्त कार्यक्षम कामकाज आणि अधिक स्मार्ट फ्लीट व्यवस्थापन शक्य होते. चालकाच्या आरामाला प्राधान्य देतया पिकअपमध्ये एअर कंडिशनिंग व हीटिंग सिस्टम असून त्यामुळे सर्व हवामान परिस्थितींमध्ये वाहन चालवणे सुलभ होते. तसेच उंचीनुसार अॅडजस्ट करता येणाऱ्या ड्रायव्हर सीटमुळे एर्गोनोमिक सपोर्ट मिळतो. शिवाय, D+2 आसनरचना यामुळे या वाहनाचा वापर अनेक प्रकारच्या उपयोजनांसाठी केला जाऊ शकतो.

3050 mm लांबीचा प्रशस्त कार्गो बेड असलेले हे वाहन सहजतेने मोठे लोड हाताळू शकते. यामध्ये मजबूत 16-इंच टायर आणि पुढील व मागील अ‍ॅक्सलवर टिकाऊ लीफ स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आले आहेत. ते विविध प्रकारच्या प्रदेशात उत्कृष्ट पकड आणि स्थिरता पुरविते.

महिंद्राने बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG चे सादरीकरण करून मजबूतीटिकाऊपणाविश्वासार्हताकमी देखभाल खर्च आणि उच्च पुनर्विक्री मूल्यासंदर्भातील आपले नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भारताच्या वाहतूक व लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या सतत बदलत्या गरजांना पूर्ततेसाठी हे भविष्यकालीन उपयुक्त वाहन खास तयार करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...