शहराच्या पाहुणचार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींना मिळणार सन्मान
डीएलसी गाइड ही जगातील पहिली स्वतंत्र दर्जांकन प्रणाली असून, तिचे सक्रिय अध्याय न्यूयॉर्क, लंडन,
दुबई, मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली या आघाडीच्या शहरांमध्ये कार्यरत.

पुणे : फाईन डाइन रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी खास विकसित करण्यात आलेली
‘डीएलसी गाइड’ ही जगातील पहिली स्वतंत्र दर्जांकन प्रणाली आता पुण्यामध्ये अधिकृतपणे प्रकाशित
करण्यात आली आहे. डेला ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष जिमी मिस्त्री यांची ‘डीएलसी गाइड’ ही संकल्पना
आहे. त्यांनी मिशलिन आणि फोर्ब्स गाइड्स यांपासून प्रेरणा घेत एक परिवर्तन घडवणारी आणि पूर्णतः
स्वतंत्र मानांकन प्रणाली तयार केली आहे. जगभरातील आघाडीच्या हॉटेल्ससाठी आणि रेस्टॉरंट्ससाठी
नव्या मापदंडांची मांडणी तिच्यातून केली जाते. न्यूयॉर्क, लंडन, दुबई, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू
यांसारख्या मोठ्या शहरांमधील यशस्वी अध्यायांनंतर, पुण्यातील प्रकाशन हा ‘डीएलसी’च्या जागतिक
प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. जगभरात पाहुणचाराच्या उच्चतम दर्जांची ओळख
समुदाय-आधारित दृष्टिकोनातून दिली जात असाना पुण्यात ‘डीएलसी गाइड’चे प्रकाशन होणे ही मोठ्या
औचित्याची बाब आहे.
या प्रकाशन समारंभाला पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख राजेश बनसोडे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘कायनेटिक
इंजिनिअरिंग’चे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया, ‘कायनेटिक ग्रीन’च्या संस्थापिका व मुख्य
कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी, ‘बादल साबू ग्रुप’चे संस्थापक बादल साबू, ‘फाइव्ह-एफ
वर्ल्ड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, सेलिब्रिटी शेफ अमृता रायचंद, ‘क्रिसाला डेव्हलपर्स’चे
अध्यक्ष सागर अग्रवाल आणि ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे या उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी
आणि ‘डीएलसी’च्या परीक्षकांनी उपस्थित राहून या उपक्रमाच्या उच्च विश्वासार्हतेला आणि उद्योजकीय
आधाराला अधोरेखित केले.
‘डीएलसी गाइड पुणे २०२५’मध्ये पुढील रेस्टॉरंट्सचा व मान्यवरांचा समावेश आहे :
ताओ-फू, जे डब्ल्यू मॅरियट – शेफ फू लेई
उकियो, द रिट्झ कार्लटन – शेफ अभिषेक कुमार
बॅस्टियन एम्पायर – रंजीत बिंद्रा
अल्टो विनो, जे डब्ल्यू मॅरियट – शेफ ख्रिश्चियन हुबर
आस्माना, द रिट्झ कार्लटन – शेफ निशेष भार्गव
त्सुकी – शेफ निलांजन मैती
मोचा – शेफ राजीव कुमार
अल दी ला – शेफ तपस मन्ना
पुण्याच्या विकसित होत असलेल्या खाद्यसंस्कृतीत दिलेल्या अत्युत्कृष्ट योगदानासाठी या रेस्टॉरंट्सना
गौरवण्यात आले आहे. यापूर्वी, ‘डीएलसी गाइड’ने न्यूयॉर्कमधील बंगलो – शेफ विकास खन्ना, झुमा – शेफ
डॅनिएल सू, इंडियन अॅक्सेंट – शेफ शांतनू मेहरोत्रा; लंडनमधील जिमखाना – शेफ सिद आहुजा, बनारस –
शेफ समीर तनेजा, कर्नल साब – शेफ सोहन भंडारी; दुबईमधील किनोया – शेफ नेहा मिश्रा, रो-ऑन४५ –
शेफ जेसन अॅथर्टन, त्रेसिंड – शेफ मोहम्मद झीशान, मेसान १५ – शेफ रीटा सुएदान; दिल्लीतील हाऊस
ऑफ मिंग, (ताज महाल), बुखारा (आयटीसी), अल्बेरो (ताज चेंबर्स); आणि बंगळुरूमधील लुपा – शेफ मनु
चंद्रा, द १३थ फ्लोअर – शेफ खगराज शर्मा, फार्मलोर – शेफ जॉन्सन एडेनेझर यांसारख्या प्रतिष्ठित
रेस्टॉरंट्सचा सन्मान केला आहे. आजवर ५०पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सना डीएलसी गाइडचा सन्मान मिळाला
आहे, तसेच ४०हून अधिक आंतरराष्ट्रीय परीक्षक या पॅनलवर कार्यरत आहेत. ही क्रांतिकारी जागतिक
दर्जांकन प्रणाली पाहुणचार आणि पाककलेतील उत्कृष्टतेची नवी मापदंडे निश्चित करत आहे आणि जागतिक
स्तरावर आदर्श निर्माण करत आहे.
या कार्यक्रमात बोलताना ‘डेला ग्रुप’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जिमी मिस्त्री म्हणाले,
“पाहुणचार म्हणजे केवळ चविष्ट जेवण वाढणे किंवा जागा आलिशानपणे सजवणे नव्हे, तर आयुष्याला
स्पर्श करणारे, संवादाला प्रोत्साहन देणारे आणि वारसा घडवणारे अनुभव निर्माण करणे! डीएलसी
गाइडच्या माध्यमातून आम्ही केवळ उत्कृष्टतेचा सन्मान करत नाही, तर जगासाठी दर्जाचे नवे निकष
ठरवीत आहोत. मी नेहमी स्पष्टता आणि हेतुपूर्णतेच्या आधारे विचार मांडण्यावर विश्वास ठेवतो. आमचे हे
गाइड आदरातिथ्य उद्योगाच्या अधिक प्रामाणिक, प्रेरणादायी आणि उद्योजकतेच्या नेतृत्वाखालील
भविष्याकडे नेणारे आमचे एक मोठे पाऊल आहे.”
डेला लीडर्स क्लब (डीएलसी) हा उद्योजक, व्यावसायिक आणि नव्या पिढीतील नेत्यांचे जागतिक समुदाय
उभारण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला जगातील पहिला व्यावसायिक मंच आहे. द्रष्टे उद्योजक
जिमी मिस्त्री यांनी स्थापन केलेल्या या क्लबचा १७ शहरांमध्ये विस्तार असून, यामध्ये २,८०० हून अधिक
सदस्य कार्यरत आहेत. हा मंच जागतिक पातळीवरील सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेतृत्व
विकासासाठी प्रेरणा देतो. लक्झरी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठीचा स्वतंत्र जागतिक दर्जांकन मानदंड
असलेल्या डीएलसी गाइडसारख्या उपक्रमांद्वारे डीएलसी ही प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि
मूल्यनिर्मिती यांचे प्रतिनिधित्व करते. या गाइडमध्ये कोणतेही व्यावसायिक पूर्वग्रह नसल्याने, डीएलसी
सदस्यांना उद्दिष्टपूर्ण नेतृत्व करण्याची, दर्जा उंचावण्याची आणि परिणामकारक सकारात्मक बदल
घडवण्याची प्रेरणा मिळते.
‘डेला टाउनशिप’मध्ये जागतिक चवींचे अनुभव, विचारपूर्वक निवडलेली समुदायसंस्था असा खास
‘डीएलसी टच’
‘डेला’च्या आगामी थीमआधारित टाउनशिप्सना या जागतिक खाद्यसांस्कृतिक सन्मानाचा सुंदर अनुभव
मिळणार आहे. ‘उत्कृष्ट लाईफस्टाइलला प्राधान्य देणारी ठिकाणे’ अशी ओळख या टाऊनशिप्सना मिळेल.
डीएलसी गाइड या प्रणालीचा एक भाग झाल्यामुळे, येथील रहिवाशांना आता उत्कृष्ट रचना, दर्जेदार
पाहुणचार आणि जागतिक स्तरावरील भोजनमानकांद्वारे घडवलेला एक उच्च प्रतीचा, जागतिक निकषांवर
आधारित जीवनानुभव मिळणार आहे.


