पुणे- मोका लावलेला आरोपी जामिनावर बाहेर असला तरीही तो कमरेला पिस्तुल लावूनच फिरतो आहे अशी माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला बेड्या घातल्या .
पोलिसांनी सांगितले कि,’दि. २७/०६/२०२५ रोजी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दैनंदिन गस्त व रेकॉर्डवरील चेकींग मोहिमेअंतर्गत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार पथक कर्तव्यबजावत असताना, पोलीस हवालदार कुंदन शिंदे व दिनेश भांबुर्गे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नरेश ऊर्फ नव्या सचिन दिवटे हा सारसबाग परिसराजवळ कमरेस पिस्तोल वाळगून फिरत आहे.
सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांना कळविली असता त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तात्काळ स्वारगेट ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व स्टाफने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी सापळा रचून आदमबाग पाठीमागील माधवराव पेशवे पथालगत फुटपाथवरील पिंपळाचे झाडाखाली नरेश ऊर्फ नब्या सचिन दिवटे, वय-२२ वर्षे, रा. स.नं. १३३, दांडेकरपुल, पुणे यास ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याचेकडे ०१ देशी बनावटीचे पिस्तोल व ०१ जिवंत काडतूस असा एकूण रु. ४०,५००/- चा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करुन नमुद गुन्हेगारावर स्वारगेट पो.स्टे. गु.रजि.नं. १७३/२०२७ आर्मस् अॅक्ट क. ३(२७) सह म. पोअधि. ३७ (१) सह १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
आरोपी हा पोलीसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सहकारनगर व पर्वती पो.स्टे., पुणे शहर येथे खूनाचा प्रयत्न, दंगल, जबरी दुखापत, जबरी चोरी, तडीपारीचा भंग अशा गंभीर स्वरुपाचे ०७ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर सहकारनगर पो.स्टे. येथील खूनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यात ०३ वर्षापुर्वी मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. पण मोका गुन्ह्यातून आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्याने पिस्तोल बाळगण्याचा उद्देश काय आहे. तसेच त्याने पिस्तोल कोठून आणले व त्याचा पुर्वी कुठे वापर केला आहे का याबाबत तपास करण्याकरीता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत ठेव्याचे आदेश दिले आहेत .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परि-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारमळ, सपोनि अभिजीत पाटील, पोउपनिरी रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, दिनेश भांदुर्गे, श्रीधर पाटील, सागर केकाण, सुधीर इंगळे, राहुल तांबे, विक्रम सावंत, रमेश चव्हाण व विकास केंद्रे यांनी केलेली आहे.

