Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कर्करोगावरील भारतातील पहिल्या हाय डोस एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग

Date:

मुंबई,-

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी) या केंद्राने  रिलॅप्स्ड न्यूरोब्लास्टोमा या आजाराच्या 17 वर्षीय पुरूष रुग्णावर देशातील पहिली हाय-डोस 131I-mIBG थेरपी यशस्वीपणे पूर्ण केली. भारतातील कर्करोगावरील उपचारांमधील हा ऐतिहासिक टप्पा आहे. रिलॅप्स्ड न्यूरोब्लास्टोमा हा कर्करोगाचा एक प्रकार असून, तो प्रामुख्याने लहान मुलांना प्रभावित करतो.

ही प्रक्रिया 5 मे 2025 रोजी करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे 2025 रोजी ऑटोलॉगस हेमॅटोपोएटिक स्टेम सेल इन्फ्युजन करण्यात आले. “रुग्णाची प्रकृती सध्या चांगली आहे,” असे टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी टाटा मेमोरियल सेंटरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुलांमध्ये सामान्यतः आढळून येणारा सॉलिड ट्यूमर, उच्च-जोखीम असलेला न्यूरोब्लास्टोमा, यावर विशेषतः पारंपरिक उपचारपद्धती अयशस्वी ठरल्यावर हाय-डोस 131I-mIBG थेरपी हा उपचारांचा एक महत्वाचा ठरतो. या उपचारांमध्ये भारतात प्रमाणित परवानगीयोग्य डोस 5 mCi/kg (जास्तीत जास्त 300 mCi) इतका आहे, मात्र  एसीटीआरईसीने 800 mCi चा सुपर-हाय डोस दिला, जो देशातील पहिलाच होता. अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (एईआरबी) विशेष मंजुरीमुळे हे शक्य झाले.

न्यूरोब्लास्टोमा या उपचारांसाठी केमोथेरपी, शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, स्टेम सेल प्रत्यारोपण आणि इम्युनोथेरपी या उपचारांचा समावेश असलेला मल्टी-मोडालिटी दृष्टिकोन आवश्यक आहे. तथापि, अँटी-GD2 इम्युनोथेरपीसारखे काही उपचार अतिशय महाग असल्यामुळे, भारतातील रुग्णांमध्ये उपचारांचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी हाय-डोस MIBG सारख्या रेडिओआयसोटोप-आधारित उपचारांचा प्रभावी पर्याय म्हणून शोध घेतला जात आहे.

डॉ. सुदीप गुप्ता यांनी एसीटीआरईसी आणि टीएमएच मधील डॉक्टर, भौतिकशास्त्रज्ञ, तांत्रिक कर्मचारी, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या समर्पित टीमने हे गुंतागुंतीचे उपचार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उत्तम समन्वय साधून सहकार्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अशी कामगिरी केवळ अखंड टीमवर्क आणि मजबूत नेतृत्वाद्वारेच शक्य आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा महत्वाचा टप्पा गाठताना, आपल्या संबंधित युनिट्सना मार्गदर्शन केल्याबद्दल एसीटीआरईसी चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी आणि टीएमएचचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांचे आभार मानले.

या उपचारांमध्ये एवढा हाय-डोस देताना रेडिएशन सुरक्षितता, रुग्णाचे निरीक्षण आणि अनेक विभागांमध्ये अखंड समन्वय सुनिश्चित करण्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक होते. अपेक्षित एक्सपोजर पातळी मोजण्यासाठी भौतिकशास्त्रज्ञ आणि आरएसओ यांनी तपशीलवार सिम्युलेशन प्रयोग केले. ALARA (वाजवीपेक्षा कमी साध्य करण्यायोग्य) तत्त्वाचे पालन करून, कर्मचाऱ्यांचा संपर्क कमीत कमी ठेवण्यासाठी अतिरिक्त देखरेख प्रणाली आणि शिल्डिंग प्रोटोकॉल स्थापित करण्यात आले.

पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, हेमॅटोलॉजिकल ऑन्कोलॉजी (बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट) आणि ट्रान्सफ्यूजन मेडिसिन विभागाच्या सहकार्याने न्यूक्लिअर मेडिसिन विभागाने या थेरपीचे नेतृत्व केले. न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून उपचार प्रोटोकॉल सुधारण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.

या प्रक्रियेत भौतिकशास्त्रज्ञांनी किरणोत्सर्गी डोसचे अंशतः वितरण केले आणि दोन अणुवैद्यकीय डॉक्टरांनी संपर्क कमी करण्यासाठी त्याचे प्रशासन केले. रुग्णाला ACTREC च्या खास डिझाइन केलेल्या “हॉट बेड” आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते, जे उच्च-डोस रेडिओन्यूक्लाइड थेरपी सुरक्षितपणे हाताळण्यासाठी सुसज्ज होते. 

इन्फ्युजननंतर, रुग्णाच्या रक्त पेशींची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी झाली, ज्यामुळे ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली, जी थेरपीनंतर 24 व्या दिवशी यशस्वीपणे पार पडली. रुग्णाच्या रक्त पेशींची संख्या सुधारली असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

या प्रक्रियेला मिळालेल्या यशामुळे भविष्यात टीएमसीमधील पात्र रूग्णांसाठी हाय-डोस एमआयबीजी थेरपी च्या नियमीत अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सविस्तर उपचार प्रोटोकॉल आणि सुरक्षा कार्यपद्धती संदर्भासाठी संलग्न दस्तऐवजात उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...