देहराडून, उत्तराखंड – कराटे इंडिया ऑर्गनायझेशन (KIO) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये देशभरातील ३० राज्यांतील १५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र संघामध्ये चॅम्पियन कराटे क्लबचे (CKC) एकूण २८ खेळाडू निवडले गेले होते. यामध्ये सहकारनगर, पुणे येथील CKC च्या ईशा रत्नपारखी, सचित अग्रवाल व प्रांजल अवचिटे या तीन खेळाडूंनी आपली जागा पक्की केली होती.

७ वर्षे वयोगटाच्या मुली व मुले (-20kg) सब ज्युनिअर कुमिते प्रकारात, ईशा रत्नपारखी व सचित अग्रवाल यांनी अनुक्रमे रौप्य पदक जिंकत राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली.
चॅम्पियन कराटे क्लबच्या संपूर्ण संघाने ३ सुवर्ण, २ रौप्य व ५ कांस्य पदके जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली.
या तीनही खेळाडूंना सेंसेई वेदांत तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळाले आहे. ते सान-दान ब्लॅक बेल्ट, CKC पुण्याचे मुख्य प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय पदक विजेते आहेत.
चॅम्पियन कराटे क्लब इंडिया चे संस्थापक शिहान संतोष मोहिते यांनी सर्व विजेते व सहभागी खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या व संघाच्या परिश्रमाचे कौतुक केले.
ही कामगिरी केवळ CKC साठीच नाही तर संपूर्ण पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि यामुळे तरुण कराटेपटूंच्या क्षमतेची चमक राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे

