पुणे- १४ किलो गांजा पुण्यात विकायला आलेला सोनईचा तरुण पुणे पोलिसांनी गजाआड केला आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २४/०६/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करत असताना आगानगर सोसायटी गेट समोर, पुणे-नगर रोड, सार्वजनिक रोडवर इसम नामे योगेश रामभाऊ साळवे वय २५ वर्षे, रा. मु/पो सोनई गणेशपेठ, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा त्याचे जवळील स्विफ्ट डिझायर गाडी मध्ये संशयस्पदरित्या बसलेला मिळुन आला. सदर गाडीची झडती घेतली असता त्याचे गाडीच्या डिक्की मध्ये २,८१,७२०/- रु. किं. चा जांभळया रंगाच्या ट्रॅव्हल बॅग व पिवळया रंगाच्या नायलॉनच्या पोत्यामध्ये भरलेले १५ पॅकेट असा एकुण १४ किलो ०८६ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आला. सदर मालासह स्विफ्ट डिझायर गाडी, मोबाईल व इतर असा एकुण ६,९१,८२०/- रु. किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२९७/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (II) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करुन इसम नामे योगेश रामभाऊ साळवे वय २५ वर्षे, रा. मु/पो सोनाई गणेशपेठ, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याला अटक करण्यात आली आहे.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस अंमलदार विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.
१४ किलो गांजा पुण्यात विकायला आलेला सोनईचा तरुण गजाआड
Date:

