पुणे-आंबेगाव फाटा, धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी (ता. २६) या भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. २७) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.तरी सर्व नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. पाणीपुरवठा बंद असणारा भाग : निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारतीय विद्यापीठ, आंबेगाव फाटा सर्व्हे नं. १५ ते ३०, धनकवडी सर्वे क्रमांक २८, २९, ३०, ३६ ते ३७, चैतन्यनगर, अश्रयनगर, राजमुद्रा सोसायटी, रिंकुता सोसायटी, विज्ञाननगरी, मोहननगर.
उद्या धनकवडीत पाणी पुरवठा बंद —
Date:

