पुणे, दि. २४: जिल्ह्यात सेतू, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत नागरिकांना विविध आरटीएस सेवा पुरविल्या जातात, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या विविध आरटीएस सेवांचा लाभ घेण्याकरिता संकेतस्थळावर अर्ज भरताना अर्जदाराने अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
अर्जदारास त्यांच्या अर्जाची स्थिती (मंजूर, नामंजूर, अर्ज परत पाठविणे) वेळोवेळी लघुसंदेश सेवेच्या माध्यमातून समजते तसेच सेवा वितरणाची पारदर्शकता वाढते. अर्जदारास पुन्हा अर्ज करणे किंवा कार्यालयात भेट देणे टाळता येते. त्यामुळे अर्जदाराने मोबाईल क्रमांकाबाबतची माहिती अर्जाच्या ‘ॲप्लिकेशन डिटेल्स’ विभागात अचूकपणे भरावी. आपले सरकार सेवा केंद्रांनी, पर्यवेक्षीय संस्था, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे आवाहन श्री. डूडी यांनी केले आहे.

