संसद व राज्य विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवनात उत्साहात सुरू
मुंबई, दि. २३ जून २०२५ :
संसद तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळातील अंदाज समित्यांचे राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे उत्साहात सुरू आहे. देशभरातून आलेल्या समितीप्रमुख, सदस्य, तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा यात सहभाग आहे.
या संमेलनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल आणि महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून अंदाज समित्यांचे मूल्यांकनात्मक योगदान अधोरेखित केले. “समित्या म्हणजेच ‘मिनी लेजिस्लेटर्स’ असून, त्या सरकारच्या कामकाजावर काटेकोर देखरेख करत लोकहिताचे रक्षण करतात,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांनी समित्यांमधील पारदर्शकता, शिस्त व निष्पक्षतेचा आग्रह धरत, नवोदित लोकप्रतिनिधींसाठी या समित्यांचे प्रशिक्षणात्मक महत्त्वही अधोरेखित केले.
तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या अनुभवावर आधारित निरीक्षणही मांडले. त्यांनी सांगितले की, “मी जेव्हा अंदाज समितीत काम केलं, तेव्हा अर्जुन खोतकर हेच अध्यक्ष होते. त्या काळात जलसिंचन योजनांवरील साक्ष घेत असताना जाणवलं की, कमी अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे मोठे प्रश्न निर्माण झाले होते. जबाबदार अधिकाऱ्यांना अनेकदा बोलावूनही, ते स्वतः येत नसत, दुसऱ्यांना पाठवत. तीन-चार वेळा तारीख बदलूनही जे अधिकारी प्रत्यक्ष दोषी होते, ते फक्त सेवानिवृत्तीनंतरच समितीसमोर आले. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपण आमदार-खासदार म्हणून कितीही सजग असलो, तरी काही अधिकारी हे आपल्याहूनही जास्त ‘हुशार’ असतात!”
कार्यक्रमाच्या समारोपात लोकशाहीच्या मजबुतीसाठी अंदाज समित्यांनी अधिक सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
याच अनुषंगाने, समित्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारी डॉ. गोऱ्हे यांची कविता उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेली:
समितियां…
सत्ता के गलियारों में मिलती हैं आवाज़
जहाँ बनती हैं योजनाएँ, बनते हैं राज़।
समितियाँ जुटतीं, बुद्धि से भरी,
सही राह दिखाए यही उनकी जिम्मेदारी।
एक सोच से नहीं सुलझती हर बात,
छोटी से छोटी भूल भी रह जाती है साथ।
पर कई मन मिलकर जब सोचते हैं,
जन-इच्छा का सम्मान वे सच्चे दिल से करते हैं।
हर पहलू को वे ध्यान से परखते हैं,
खुले दिल-दिमाग से हर बात समझते हैं।
सामूहिक बुद्धि से आगे बढ़ते हैं,
न्याय की किरण में समाज को सजाते हैं।
आओ करें इन समितीयों का सम्मान,
सोच को रखते हैं वे निष्पक्ष और महान।
हर सदन में इनका हो विवेकी स्थान,
लोकतंत्र की आत्मा हैं ये, और यही पहचान।**

