पुणे , 23 जून 2025 : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने FY25 मध्ये चांगली कामगिरी केली, 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला, ज्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत भारतातील सर्वात विश्वासार्ह नावांपैकी एक म्हणून त्याचे स्थान अधिक भक्कम झाले. भारतातील जलद-परिवर्तनशील शहरी आणि अर्ध-शहरी मार्केटमधील वाढत्या मागणीमुळे, जिथे सुरक्षेच्या गरजा अधिकाधिक अत्याधुनिक होत आहेत, त्यांच्याकडून वाढत्या मागणीमुळे, FY26 मध्ये 15% व्यवसाय वाढीचे लक्ष्य ठेवत आहे. नवोपक्रम, तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि ग्राहक-केंद्रिततेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यवसायाद्वारे ही वाढ केली जाईल.
आधुनिक भारतीय ग्राहक आता केवळ सुरक्षा उत्पादनांचा खरेदीदार राहिलेला नाही तर तो डिझाइनप्रति जागरूक घरमालक, तंत्रज्ञान-जाणकार पालक, निर्णय घेणाऱ्या महिला आणि विश्वास तसेच पारदर्शकता शोधणारा व्यवसाय मालक आहे. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार बदल करणे, त्यांच्या जीवनात केवळ संरक्षणच नाही तर अखंडपणे एकत्रित करणारे सुरक्षा उपाय तयार करणे यावर गोदरेजचा दृष्टिकोन आधारित आहे.
या दृष्टिकोनावर आधारित, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “आज ग्राहकांना फक्त सुरक्षितता नकोय, तर त्यांना त्यांच्या जीवनाशी जुळवून घेणारे स्मार्ट, अखंड आणि विश्वासार्ह सुरक्षा उपाय हवे आहेत. सुरक्षेच्या पलीकडे जाऊन विश्वास, सुविधा आणि मनःशांती निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाने व्यक्ती आणि संस्थांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. FY25 ची कामगिरी केवळ आमच्या इनोव्हेशन इंजिनलाच नव्हे तर महत्त्वाच्या विभागांमध्ये आम्ही मिळवलेला खोल विश्वास देखील प्रतिबिंबित करतो. FY26 मध्ये प्रवेश करताना, प्रत्येक सुरक्षा टचपॉइंटमध्ये बुद्धिमत्ता, अनुपालन आणि सहजता अंतर्भूत करण्याकडे आमचे लक्ष्य असेल.”
ग्राहक आणि व्यवसायांच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करणाऱ्या प्रमुख उत्पादन नवकल्पनांनी गोदरेजचे FY25 चे यश चिन्हांकित केले. भारतातील पहिली स्वदेशी फॉगिंग सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्टफॉगच्या लाँचिंगमुळे चोरी रोखण्यासाठी रिअल टाइममध्ये सक्रिय प्रतिबंधक तंत्रज्ञान सादर करण्यात आले. डिफेंडर ऑरम प्रो रॉयल ही दागिने उद्योगासाठी तयार केलेली बीआयएस-प्रमाणित मेकॅनिकल सेफने अनुपालन-चलित ऑफरिंगमध्ये गोदरेजचे नेतृत्व बळकट केले. दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अत्याधुनिक चाचणी मशीन अॅक्यूगोल्डने किरकोळ विक्रेत्यांना पारदर्शकता आणि गती दिली. यासोबतच त्यांनी आधुनिक भारतीय ग्राहकांच्या डिझाइन प्रणित नवोपक्रमांची मागणी लक्षात घेत त्यांच्या होम लॉकर्स पोर्टफोलिओचा विस्तार देखील केला. मोबाइल-सक्षम, रिअल-टाइम देखरेख क्षमतांसाठी ग्राहकांच्या वाढत्या पसंतीला प्रतिसाद देत, गोदरेजने क्लाउड-आधारित लक्ष ठेवण्याच्या प्रणालींमध्ये देखील विस्तार केला.
केवळ उत्पादन नवोन्मेष एवढेच ब्रँडचे धोरण नाही तर ते मानव-केंद्रित देखील आहे. उदाहरणार्थ, आता अनेक महिला घराच्या सुरक्षिततेचे निर्णय घेतात. आणि त्यांच्या सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी गोदरेजने त्यांच्या ऑफरिंग्ज आवाक्यातील आणि सुंदर बनवल्या आहेत. यामुळे त्या सोयीच्या तर ठरतातच आणि त्याने मनःशांती देखील मिळते. फिंगरप्रिंटने उघडणारे स्मार्ट लॉकर्स असोत किंवा स्मार्ट होम कॅमेरे असोत, गोदरेज महत्त्वाच्या लोकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींची सुरक्षा करतो.
हुमायूनची कबर, नया रायपूरमधील सीएम हाऊस, आयआयएम जम्मू, विविध विमानतळांचे प्रकल्पांची सुरक्षा करून प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये देखील योगदान दिले आणि उच्च-मूल्याच्या पायाभूत सुविधांसाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची आपली क्षमता अधोरेखित केली. या यशस्वी प्रोजेक्ट्सना चॅनेल भागीदारांचे देशव्यापी नेटवर्क, ग्राहक केंद्रांचे अधिक डिजिटलायझेशन आणि विशेषतः बीएफएसआय, दागिने आणि किरकोळ क्षेत्रातील बीआयएस-प्रमाणित आणि उच्च-तंत्रज्ञान सुरक्षा ऑफरच्या महत्त्वासंबंधीच्या जनजागृती मोहिमांचा मोठा वाटा होता.
स्मार्ट शहरे, एआय-नेतृत्वाखालील प्रणाली आणि डेटा-चालित जीवनशैली भारत स्वीकारत असताना, सुरक्षेचे भविष्य घडवण्यासाठी गोदरेज महत्त्वाच्या स्थानी आहे. विश्वासाचा वारसा, संशोधन आणि विकासात सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोन यामुळे, हा व्यवसाय संस्था आणि व्यक्तींसाठी नवीन मूल्ये तयार करत आहे ज्यामुळे त्यांच्या केवळ मालमत्तेचेच नव्हे तर महत्त्वाकांक्षांचे संरक्षण होते आहे.

