पालखी विठोबा चौक, भवानी पेठ येथे विश्व हिंदू परिषदेच्या आषाढी वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला .
विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं गेली ३८ वर्षे पुणे ते पंढरपूर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकरी बंधू-भगिनींसाठी अखंड वैद्यकीय तथा आरोग्य सेवा देण्यात येत असून या यंदाच्या सेवेकार्याचा शुभारंभ करण्यात आला. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या माध्यमातून हे पुणे ते श्री क्षेत्र पंढरपूरदरम्यान दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावेळी परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, ससून रुग्णालायचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, परिषदेचे क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख श्री. संजय मुरदाळे, धर्मप्रसार सह प्रमुख श्री. संजय कुलकर्णी, धर्माचार्य सहप्रमुख श्री. नागनाथ बोंगरगे, विशेष संपर्क सह प्रमुख श्री. श्रीकांत चिल्लाळ, लीनाताई भावे, श्री. शरद जगताप, बजरंग दलाचे प्रांत संयोजक श्री. नितीन महाजन, श्री. संतोष अंगोलकर, श्री. विजय कांबळे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


