पुणे-आगामी मनपा निवडणुकीत महाआघाडी म्हणून निवडणुकीस सामाेरे जाणार असून मुंबईत उद्धव ठाकरे हेच शक्तीशाली नेते असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिका करत सांगितले की, पवार यांना त्यांच्यापेक्षा आणखी काेणीतरी पाॅवरफुल आहे हे म्हणावे लागते. त्यांच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीला पाॅवरफुल म्हणावे लागणे पवार यांचा मनाचा माेठेपणा आहे असेही म्हटले आहे.
हिंदी सक्तीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याची गरज नाही. त्यातील समाजकारण सुध्दा शाेधले पाहिजे. हिंदी ही एका अर्थाने शाळेत सक्तीची करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घरफाेडीचा आराेप केला त्याबाबत ते म्हणाले, अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून उत्तमरीतीने काम करत आहे. त्यांनी काेणाचे घर फाेडलेले नाही. लाेकशाहीमध्ये काेणी काेणाचे पक्षात जावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. काेणाला मानगुटीला पकडून आणण्यात आले नाही. दांडुका काेणाला दाखवला नाही. तुम्हाला तुमची माणसे टिकवता येत नाही अशीस्थिती आगामी मुंबई निवडणुकीत येणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की,उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार मिळणे कठीण हाेईल ..जर त्यांनी मनसेसाेबत युती केली तरच थाेड्याफार जागा येतील. 92 पैकी 75 नगरसेवक त्यांचे साेडून गेलेले आहे. आणखी चार महिने असून उर्वरित किती जातील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, काॅंग्रेसला साेबत घेऊन पाहिले परंतु अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे आता मनसेला साेबत घेऊन ते पाहत आहे. लाेकशहाीत समाेर चांगले विराेधक असले पाहिजे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी मे महिन्यात भरपूर पाऊस झाला आहे. मे महिन्यात वळवी पाऊस पडत असताना यंदा खूप माेठ्या प्रमाणात पाऊस पडला. ढगफुटी मध्ये कमी वेळेत अधिक पाऊस हाेत असल्याने ज्या नियमित सुविधा त्यावर ताण निर्माण हाेताे. पुण्यात पाऊसाचे पाणी वाहून नेणारी पाईपलाइनचे दिसत नाही त्यामुळे याबाबत मनपा आयुक्त यांना सूचना दिल्या आहे. राजकारणात कधी पूर्णविराम नसताे तर स्वल्पविराम असताे.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमास आज जाणार नव्हते परंतु गेले त्यामुळे राजकारणातून निवृत्त काेण हाेते असे म्हणणे याेग्य नाही.

