नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

Date:

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर निर्णायक बैठक

पिंपरी (दि.१९) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसीसह इतर हद्दीत नियमांचा भंग करून बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. नैसर्गिक ओढे – नाल्यांचा प्रवाह खंडित केल्यामुळे हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत प्रलंबित कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले.

हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्तीसह नागरी सोयी सुविधांच्या अनुषंगाने गत आठवड्यापासून विविध कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. यात हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगत असलेला राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे आदी कामे झाल्याने बहुताश प्रमाणात अडचणी निकाली निघाल्या आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे काही कामे करण्यास वेळ लागत आहे. अशी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, यावेळी महानगर आयुक्त यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर यांनी दिले.

ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जवळपास १५ ठ‍िकाणी काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर स्थलांतरित केल्याचे पुढे येत आहे. अशी बांधकामे तातडीने थांबविण्याचे तसेच मनमर्जी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक यंत्रणेने आपले काम जबाबदारीने केल्याने बहुताश प्रश्न निकाली निघालेत. या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता र‍िनाज पठाण, मुख्य अभियंता न‍ितीन वानखेडे यांच्यासह एमआयडीसी, एमपीसीबी, पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लि., सार्वजनिक बांधकाम विभाग, दोहलरसह हिंजवडीतील कंपन्यांचे प्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, हिंजवडी, मान, मारुंजी या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यंत्रणेमार्फत सुरू असलेली कामे
१) एमआयडीसी विभागामार्फत मेट्रो मार्गिकेलगतची नाले साफसफाई.
२) एमआयडीसी विभागामार्फत डोहलर कंपनीसमोर, साई प्रोविजो इमारतीच्या ठिकाणी, मेट्रो स्थानक क्र.२ येथील वनविभागाच्या जागेलगत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची स्वच्छता.
३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या मुख्य रस्त्यावरील मेट्रो स्थानक क्र. १ येथील अनधिकृत स्टॉल काढले.
४) प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागामार्फत विलास जावडेकर यांचे प्रकल्पास काढली नोटीस. स्थानक क्र. ३ येथील जावडेकर इमारत भागातील अनधिकृत रॅम्पचे न‍िष्कासन. हिंजवडी फेज – २ येथील पांडवनगरातील राडारोड्याची विल्हेवाट.
५) एमआयडीसी, प्राधिकरण आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समवेत पथदिवे हस्तांतरणासंबंधी संयुक्त पाहणीनंतर दुरुस्तीचे काम सुरु.
६) मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत मेट्रो स्थानक भागातील राडाराडा उचलण्याचे काम प्रगतीपथावर.
७) टाटा कंपनीमार्फत स्टेशनच्या ठिकाणी दिशादर्शक, माहितीफलक लावले.
८) मेट्रो सवलतकार कंपनी, एमआयडीसीमार्फत खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर.
९) मेट्रो मार्गिकेलगत ज्याठिकाणी ड्रेन ब्लॉक झाली, त्याठिकाणी एमआयडीसी व टाटा कंपनीमार्फत साफसफाई.
१०) नांदे चांदे रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले. यासह इतर आवश्यक ती कामे सुरु आहे.

नागरिकांकडून जाणून घेतल्या समस्या
पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत हिंजवडीसह परिसरातील काही नागरिकांना देखील बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. गत आठवड्याभरापासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांवर लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...