पुणे _
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षात १९८४ नंतर राजकारणात जी अस्थिरता निर्माण झाली होती ती संपुष्टात आणली. सरकार २४/७ काम करते आणि पंतप्रधान २४ तास काम करतात. “सबका साथ, सबका विकास” नुसार सरकार काम करत आहे. काँग्रेस काळात रोज विविध मंत्री यांच्यावर भ्रष्टाचार आरोप होत होते, त्यांना राजीनामे द्यावे लागत होते. पण मागील ११ वर्षात कोणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचार आरोप झाले नाही ही महत्वपूर्ण बाब आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले.”सेवा सुशासन आणि गरीब कल्याणचे ११ वर्ष” या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे,राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर , पुनीत जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुख अमोल कविटकर , हेमंत लेले उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, भाजपची जगातील प्रतिमा वाढलेली असून परदेशातील भारतीय नागरिक यांना गौरवाची अनुभूती येत आहे. जागतिक चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची झाली आहे.देशातील ३० कोटी गरीब लोक गरीबी रेषाच्यावर आणले गेले याची संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घेतली.केंद्र सरकारने गरीब यांना वेगेवगळ्या जीवनावश्यक वस्तू दिल्या आहे. देशाची सुरक्षा आता मजबूत झाली आहे. पूर्वी काँग्रेस काळात संरक्षण खरेदी मध्ये दलाल मध्यस्थी होती आणि अनेक भ्रष्टाचार होत होते. दिल्ली मधील दलाल यांचे हॉटेल मधील भ्रष्टाचार व्यवहार बंद झाले. संरक्षण सामुग्री व्यवहारात पारदर्शकता आली. पुण्यासारख्या ठिकाणी पाच हजार कंपन्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत झाल्या. संरक्षण क्षेत्रातील तोट्या मधील कंपन्या आर्थिक भरभराटी मध्ये आलेल्या आहे.आपल्या देशावर हल्ला झाल्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्या गेला. त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मध्ये शिरून दहशतवाद ठिकाणावर हल्ले केले. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले गेले. युद्धाचे स्वरूप बदलले तरी आपण त्यात तरबेज असल्याचे दाखवून दिले. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील बॉम्बस्फोट बंद झाले हे कायदा आणि सुव्यवस्था याची चांगली स्थिती असल्याचे लक्षण आहे. नक्षलवाद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. पुढील वर्षी त्यात यश मिळेल कारण दोन जिल्हा पुरता तो मर्यादित झाला आहे. जम्मू काश्मीर मध्ये रोजगार नवीन संधी पर्यटन वाढवून निर्माण केल्या. पूर्वी चार शहरात मेट्रो होती पण आता देशात २३ शहरात मेट्रो आहे, १४२ वंदे भारत सुरू झाल्या, ७० हजार किलोमीटर नवीन महामार्ग निर्माण झाले, दहा टक्के इडब्ल्यूएस आरक्षण मिळाले, डिजिटल क्रांती झाली असून रोज ६० कोटी आर्थिक व्यवहार होत आहे. देशात १३० कोटी मोबाईल वापरकर्ते, १४० आधारकार्डधारक, ९७ कोटी इंटरनेट धारक झाले आहे. रेल्वे स्टेशनवर स्वच्छता निर्माण केली गेली. छोट्या स्टेशनवर प्रवासी सुविधा निर्माण केल्या गेल्या. स्वातंत्रनंतर प्रथमच प्रत्येक शेतकरी यास ३८ हजार रुपये बँक खात्यात थेट मिळाले आहे. काँग्रेस काळात शेतकरी यांना आठ लाख कोटी रुपये कर्जमाफी दिली गेली. पण एनडीए काळात शेतकरी यांना ३० लाख कोटी रुपये कर्जमाफी दिली गेली आहे. सर्व सरकारी बँक फायदा मध्ये आलेल्या आहे. कुंभमेळ्यात ६३ कोटी लोक आले याबाबत शिस्तीने नियोजन करण्यात आले.

