खराडी-वाघोली पट्ट्यात या महिन्यातील कंपनीचे हे दुसरे भूसंपादन आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून एकत्रितरित्या INR 7,300 कोटींचा महसूल निर्माण होईल असा अंदाज आहे.*
भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL), (BSE स्क्रिप आयडी: GODREJPROP) ने पुण्यातील अप्पर खराडी येथे सुमारे 16 एकर जमीन विकसित करणार असल्याची घोषणा आज केली.
या जमिनीवर प्रामुख्याने प्रीमियम ग्रुप हाऊसिंग आणि हाय-स्ट्रीट रिटेल उभारले जाईल. प्रस्तावित प्रकल्पातून सुमारे 2.5 दशलक्ष चौरस फूट भाग विकासासाठी मिळेल, असा अंदाज असून यातून सुमारे 3,100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.*
मार्केटच्या दृष्टीने हा भूखंड अत्यंत मोक्याच्या जागी, खराडी-वाघोलीच्या मायक्रो बाजारपेठेत आहे. यामुळे प्रमुख व्यावसायिक सेंटर्ससोबत चांगली कनेक्टिव्हिटी आहे. तसेच विमान नगर, मगरपट्टा आणि हडपसर अशा आयटी हबच्या अगदी जवळ आहे. याचबरोबर इथे आसपास शाळा, रुग्णालये, मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि प्रीमियम हॉटेल्स अशा सामाजिक सुविधा देखील चिकार आहेत. ज्यामुळे घर खरेदीदारांसाठी या भागाचे आकर्षण जास्त वाढते.
गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “येथील पायाभूत सुविधा आणि मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे अपर खराडी हे पुण्यातील सर्वात विकसित रिअल इस्टेट कॉरिडॉर म्हणून वेगाने विकसित होत आहे. सूक्ष्म बाजारपेठेतील हे आमचे दुसरे भूसंपादन आहे, जे या क्षेत्राची वाढती मागणी आणि संपूर्ण भारतातील उच्च-संभाव्य शहरी क्लस्टर्समध्ये विस्तार करण्याची आमची वचनबद्धता दोन्ही प्रतिबिंबित करते. विचारपूर्वक डिझाइन आणि भविष्यासाठी विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवत याला एक दीर्घकालीन मूल्य मिळेल तसेच रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करेल.”

