:भाजपशासित राज्यात अधिकाऱ्यांचे पार पोतेरे झाले ..
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये किरीट सोमय्या हे निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बसलेले दिसत आहेत. यावरून सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या या इसमाला ओळखता का? होय होय, तेच ते, मुलुंडचे एचडी व्हिडिओ स्पेशलिस्ट, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली आहे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, 5-5 वर्ष अभ्यास करून अधिकारी झालेल्या अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर असे ऐरे-गैरे लोक बसूच कसे शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपशासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पार पोतेरे करून ठेवले असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे.

