(मंगळवार, दि. १७ जून ते गुरुवार, दि. १९ जून २०२५)
पुणे, दि १६ जून : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने (मंगळवार, दि. १७ जून ते गुरुवार, दि. १९ जून २०२५) या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने व्याख्यान/प्रवचन/कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार, दि.१७ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शांतीब्रह्म ह.भ.प. मारुती महाराज कुर्हेकर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, माधव खांडेकर, योगी निरंजननाथजी, ह.भ.प.श्री. जालिंदर विश्वनाथ मोरे, डॉ. भावार्थ देखणे, ह.भ.प श्री. बापुसाहेब मोरे-देहूकर, श्री. बाळासाहेब काशीद, ह.भ.प. श्री. विष्णू महाराज केंद्रे, सुरेश काका वडगावकर, श्री. बबनराव कुर्हाडे-पाटील, ह.भ.प. रविदास महाराज शिरसाठ, श्री. नंदकुमार वडगांवकर व ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर यांना विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आहे.
तीन दिवसांच्या या महोत्सवात सायंकाळच्या ५.१५ ते ६.१५च्या सत्रात श्रीक्षेत्र नेवासा येथील ह.भ.प. उध्दवमहाराज मंडलिक, परभणी येथील ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर यांची व्याख्याने / प्रवचने होणार आहेत.
सायंकाळच्या ७ ते ९ च्या सत्रात ठाणे येथील ह.भ.प.श्री. जगन्नाथ महाराज पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर (सातारकर) व ह.भ.प.श्री.चितंबरेश्वर साखरे यांची कीर्तने होणार आहेत.
रोज रात्री ९.१५ ते ११.३०च्या सत्रात ज्ञानेश्वरी गाडगे यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, सौ. आसावरी बोधनकर-जोशी यांचा भक्तीचा ओलावा हा भक्तीसंगाचा कार्यक्रम, पंडित श्री. रघुनाथजी खंडाळकर, सुरंजन व शुभम खंडाळकर यांचा संतवाणी गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच सकाळच्या सत्रात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली करंजीकर, संत सावळाराम महाराज परंपरेचे पाईक ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत व वारकरी भूषण ह.भ.प. श्री. पोपट महाराज कासारखेडकर यांची कीर्तने होणार आहेत.
त्याचप्रमाणे दुपारी २ ते ४.३० वाजेपर्यंत ह.भ.प. अनिरुद्ध महाराज कारकर, ह.भ.प.बळवंत पांचाळ, ह.भ.प.तुकाराम पांचाळ, श्री. गोपाळ ढेंबरे, ह.भ.प.अनिरुद्ध नालेगांवकर यांचा अभंगवाणी कार्यक्रम होईल. ह.भ.प. अभिमन्यू आबा पांचाळ, ह.भ.प.संतोष साळुंके, ह.भ.प.श्री. वैभवराजे सोळंके, ह.भ.प.रोहितजी खवले यांचा सांप्रदायिक अभंग गवळणीचा कार्यक्रम आणि राजा परांजपे प्रतिष्ठान निर्मित अभंगरंग हा कार्यक्रम गायक श्रेयस बडवे, ऋषिकेश बडवे, सौरभ काडगावकर व संपदा थेटे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम सादर होणार आहे.
काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ व विश्वदर्शन देवता भजनी मंडळ, विश्वराजबाग, पुणे हे करतील.
अशी माहिती युनेस्को अध्यासन प्रमुख व विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.
पालखी सोहळ्यानिमित्त लोकशिक्षणपर कार्यक्रम आजपासून
Date:

