पुणे -रोटरी क्लब औंधच्या अध्यक्षपदी योगिनी जोशी यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष राजेंद्र शेलार यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सचिवपदी सतीश उस्तुरीकर यांची निवड करण्यात आली. तर खजिनदारपदी अनिन्दिता नंदी यांची निवड करण्यात आली. सदानंद रिसोर्ट बाणेर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल कीर्ती केळकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य, व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंग बोलतांना नवनियुक्त अध्यक्ष योगिनी जोशी यांनी आगामी काळात दिव्यांग युवकांसाठी स्कील डेव्हलपमेंट,वृक्षारोपण, हॅप्पी व्हिलेज, रक्तदान शिबीर, सर्वायकल कॅन्सर, ग्रीन प्रोजेक्ट ,जीवित नदी आदी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
रोटरी क्लब औंधच्या अध्यक्षपदी योगिनी जोशी.
Date:

