Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर : समर नखाते

Date:

पुणे : फिल्म इंडस्ट्रीतील करिअरबद्दल समाजात भाबड्या, भ्रामक आणि भयाण कल्पना पसरलेल्या आहेत. या क्षेत्रात करिअर म्हणजे भरपूर पैसा आणि लोकांनी ‌‘लय भारी‌’ म्हणणे असे नसून तुमच्यातील कौशल्य अधिक समृद्ध होत तुमचे अस्तित्व व्यापक पातळीवर काही देऊ असणारे पाहिजे. थोडक्यात व्यापक अभिसरण, मुक्त व्यवहारातून करिअर घडत असते. मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट प्रशिक्षक समर नखाते यांनी केले. ‌‘कॅमेरा इज द डेडलिएस्ट वेपन‌’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावरील प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवसाची (दि. 15) सुरुवात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘फिल्म इंडस्ट्री, ग्लॅमर, करियर आणि बरंच काही‌’ या विषयावर समर नखाते यांच्या मुलाखतीने झाली. त्यांच्याशी लेखक, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी संवाद साधला.
कलेबद्दल बोलताना समर नखाते पुढे म्हणाले, कलेची गरज आहे का, कला कशाला म्हणायचे हे मुद्दे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कलेत पैसा गृहित धरलेला आहेच. कलेची जोपासना करणारी मानसिकता असलेली शिक्षण संस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. संस्थात्मक पातळीवर जसे कलेला समृद्ध करायचे असते तसेच कलेचे कौटुंबिक पातळीवरही अभिसरण होणे आवश्यक आहे. व्यापक सामाजिक चलनाचा व्यवहार म्हणजे करिअर होय. चुका करायची भीती वाटू देऊ नका. कला सादर करणाऱ्याने आणि बघणाऱ्यानेही सातत्याने रियाज करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
समाजमन बदलत गेल्याच्या जाणिवा शिक्षण संस्थांनी देखील समजून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार अभ्यासक्रम, गुणवत्ता, उत्तम शिक्षक याविषयी शिक्षण संस्थांनी भान ठेवले पाहिजे. सध्या फिल्म इंडस्ट्रीसह सर्वच क्षेत्रात एक्सलन्सची डिमांड नसणारा समाज निर्माण होत आहे. त्यामुळे हौशे, नवशे, गवशे यावर समाज विसंबून रहात आहे. परंतु समाज हा गुणग्राहक असणे आवश्यक असल्याचे नखाते म्हणाले. ते पुढे म्हणाले, सामान्यातून असामान्यत्वाकडे जातांना मानवी भावनांना उचलले जाते त्याला ओलांडून जाते ती खरी कला होय. आज आपल्याला चांगल्या-समंजस कलेला न्याय देणाऱ्या, साकार करणाऱ्या पिढ्या घडविण्याचे आव्हान आहे.
प्रास्ताविक प्रसाद मिरासदार यांनी तर स्वागत सुनील महाजन यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...