पुणे- दक्षिण पुणे गेल्या १० वर्षात गुन्हेगारीचे आगर बनले असून अवैध धंद्यांचा, बेकायदा बांधकामांचा येथे सुळसुळाट झालेला आहे याच भागातील कात्रज मध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय कटीमणी नावाच्या व्यक्तीला बुधवार पेठेत पकडून पोलिसांनी तब्बल १२ लाखाचे MD मॅफेड्रॉन त्याच्याकडून हस्तगत केले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि कारवाई झाली, पोलिसांनी सांगितले कि,’दि.१४/०६/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, म. पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ असे फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सय्यद साहिल नजीर शेख यांना मिळालेले बातमीवरुन बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड, पुणे. येथे शरणप्पा नागाप्पा कटिमणी, वय ३४ वर्षे, रा. आप्पा दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे. मुळ रा. मु.पो. भापर गल्ली, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक. याला पकडण्यात आले त्याच्या ताब्यात यावेळी असलेला एकुण १२,१२,३६०/- रु.कि.चा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच रोख रक्कम इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द फरासखाना पोस्टे गु.र.नं.११८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगिरी ही पोलीस आयुक्तअमितेश कुमार, पोलीस सह. आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, मपोउपनि अस्मिता लाड व पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे, यांनी केली आहे.

