मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आहे. रविवार, दिनांक 15/06/2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून सदर लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. सदर दुर्घटने मधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1)पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान 02 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 03 व्यक्ती अडकले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुणे–मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.कुंडमळा हे पुण्यापासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. मुंबईकडे जाताना, एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी हे ठिकाण लागते. या ठिकाणी कुंडमळा धबधबा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. मोठ्या संख्येने येथे पर्यटक येत असतात.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.
घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
आमदार सुनील शेळके यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
कुंडमळा, हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितलं जातय. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.

