पुणेः आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. शरद मोहोळ यांचं हिंदुत्वासाठी मोठं काम होतं, असंही नितेश राणे म्हणाले.
मोहोळ कुटुंबाचं हिंदुत्वासाठी निर्विवाद काम आहे. कुठलाही प्रश्न निर्माण झाला की मोहोळ कुटुंब कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं आहे. या संकटाच्या काळात वहिनींबरोबर उभं राहाणं माझी नैतिक जबाबदारी आहे. हिंदू म्हणून माझी ती जबाबदारी आहे. आज आधार देण्यासाठी मी आलो आहे. हिंदुत्वाचं काम असंच पुढे घेऊन जावं, अशी विनंती मी त्यांना केली आहे.
राणे पुढे म्हणाले की, हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठेही खचून जाता कामा नये. आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. पोलिस योग्य तो तपास करत आहे. या तपासामध्ये टप्प्याटप्प्यात काय होतं, ते येणाऱ्या काळात कळेलच.
रात्री-बेरात्री कुठेही हिंदू समाजावर संकट आलं तर ताई आणि त्यांचे पती उभे राहिलेले आहेत. या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली.

