पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरत मित्र मंडळ महाशिवरात्र समिती व मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. त्यांना तुळशी हार, तुकाराम महाराज पगडी व वीणा प्रदान करण्यात आली. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब दाभेकर, सदानंद मोरे, निरंजन दाभेकर, अनिल येनपुरे, राजेश पांडे(भाजप),संदीप खर्डेकर (भाजप),मंदार जोशी (आरपीआय),रुपालीताई पाटील(राष्ट्रवादी अजितदादा),अरविंद शिंदे(कॉंग्रेस),अभय छाजेड(कॉंग्रेस),नगरसेवक बाळासाहेब बोडके,नगरसेवक योगेश समेळ, आ.हेमंत रासने, प्रमोद घाडगे, राजेंद्र पंडित, महेश वाघ, अजित दरेकर,दत्ताभाऊ सागरे, आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध पक्षाचे पदाधिकारी,सदस्य व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सदानंद मोरे यांनी बाळासाहेब दाभेकर यांचे सर्व पक्षातील लोकांशी प्रेमाचे संबंध आहेत ,हा जणूकाही बाळासाहेब दाभेकर यांचा पुणेरी पॅटर्न आहे असे सांगितले व सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात याचे आनुकरण सर्वत्र झाले पाहिजे व विशेषतः मुंबईने सुद्धा हा पॅटर्न राबवावा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम स्थळी रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ८२ रक्दात्यानी रक्तदान केले. शिबिराचे तांत्रिक संचालन आचार्य आनंद ऋषीजी रक्त पेढीने डॉ.अंकिता जाधव व सुनील खताळ यांच्या निर्देशाने केले.
बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.
Date:

