Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 एसबीआय तर्फे 13,455  ज्युनियर असोसिएट्सची भरती

Date:

·  एसबीआय अध्यक्ष : विकसित होत असलेल्या कार्यात्मक आणि तंत्रज्ञानात्मक आवश्यकतांनुसार  सुसंगठित कौशल्य विकास कार्यक्रम राबवून आमची मनुष्यबळ विकास क्षमता अधिक बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.

मुंबई, जून 11, 2025: देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने देशभरातील शाखांमध्ये ग्राहकांना मिळणारा अनुभव समृद्ध करण्यासाठी 13,455 ज्युनियर असोसिएट्सची (कनिष्ठ सहयोगी) भरती केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी आता बँकेच्या अधिकृत करिअर्स पोर्टलवर उपलब्ध आहे.

ही भरती 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रिक्त पदे भरून काढण्यासाठी करण्यात आली. त्यायोगे ही भरती मोहीम या उद्योगातील एक लक्षणीय बाब ठरली आहे.

या निवड प्रक्रियेची सुरुवात फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षांपासून झाली आणि मुख्य परीक्षा एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आली. काटेकोर आणि पारदर्शक मूल्यमापन प्रक्रियेनंतर 13,455 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

या घोषणेबाबत बोलताना एसबीआय चे अध्यक्ष श्री सी. एस. शेट्टी म्हणाले, “वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत आमच्याकडे सुमारे 18,000 लोकांची भरती करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे 13,500 ही लिपिक श्रेणीतील भरती असेल, 3,000 जणांची भरती प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि स्थानिक अधिकारी म्हणून असेल. ही नवी प्रतिभावान भरती करत असताना विकसित होत असलेल्या कार्यात्मक आणि तंत्रज्ञानात्मक आवश्यकतांनुसार सुसंगठित कौशल्य विकास कार्यक्रम राबवून आमची मनुष्यबळ विकास क्षमता अधिक बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.”

2,36,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी भारतीय स्टेट बँक अर्थपूर्ण रोजगार निर्माण करण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्रातील पुढील पिढीला घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

भारतीय स्टेट बँकेबद्दल :

मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी व्यापारी बँक आहे. देशातील सर्वात मोठ्या तारण कर्जदारांपैकी एक असलेल्या या बँकेने आतापर्यंत सुमारे 30 लाख भारतीय कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. बँकेचा गृहकर्जाचा पोर्टफोलिओ 8.3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. मार्च 2025 पर्यंत, 39.97% च्या CASA गुणोत्तरासह बँकेकडे 53.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत आणि 42.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वितरण केले आहे. ‘न्यूजवीक’नुसार जगातील चौथ्या क्रमांकाची विश्वासार्ह बँक म्हणून स्थान मिळवलेल्या एसबीआयचा गृह कर्ज आणि वाहन कर्जामध्ये अनुक्रमे 27.3% आणि 20.2% मार्केट शेअर आहे. एसबीआयच्या भारतात 22,937 शाखा आणि 63,791 एटीएम / एडीडब्ल्यूएमचे सर्वात मोठे जाळे असून 77,000 हून अधिक बीसी आउटलेट्स आहेत. इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 13.9 कोटी आहे. एसबीआयचे डिजिटल धोरण मार्गी लागल्याने, आर्थिक वर्ष 2025 मध्ये बँकेने 64% नवीन बचत खाती एकात्मिक डिजिटल आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोद्वारे उघडली आहेत. 8.77 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या योनोमध्ये आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत 24.1 लाख नवीन योनो नोंदणी झाली. डिजिटल कर्जाच्या बाबतीत, बँकेने आर्थिक वर्ष 2025 दरम्यान योनोद्वारे 6,375 कोटी रुपयांचे प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन (पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर वैयक्तिक कर्ज) वितरित केले. 31 मार्च 2025 पर्यंत एसबीआयचे फेसबुकवर 19 दशलक्ष फॉलोअर्स, इन्स्टाग्रामवर 3 दशलक्ष फॉलोअर्स, एक्सवर 4.8 दशलक्ष फॉलोअर्स आणि यूट्यूबवर 5.71 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्सवर भारतीय स्टेट बँक जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलो केली जाणारी बँक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...