हैदराबादमध्ये ‘प्रोक्टोहिता २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषद : पाईल्स, फिशर, फिस्चुला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार
पुणे : आंतरराष्ट्रीय पाईल्स, फिशर व फिस्चुला परिषदेत पुण्याचे डॉ. सुनील दिवाकर अंभोरे यांना पाईल्स, फिशर व फिस्चुला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हैदराबादमध्ये ‘प्रोक्टोहिता २०२५’ ही आंतरराष्ट्रीय पाईल्स, फिशर व फिस्चुला विषयावरील भव्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. मनोरंजन साहू यांच्या हस्ते डॉ. अंभोरे यांना सन्मानित करण्यात आले.
या परिषदेत डॉ. अंभोरे यांना २ थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक व २ सत्रांचे संचालन करण्याचा मान मिळाला. देशभरातील सुमारे ४०० नामांकित सर्जन्सच्या उपस्थितीत या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यांनी गुरु डॉ. एम.डी.पी. राजा सर यांचे आभार मानत त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.
‘प्रोक्टोहिता २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेला जगभरातील मान्यताप्राप्त प्रॉक्टोलॉजिस्ट्सची उपस्थिती लाभली. यामध्ये सेप्टा ब्लाॅकचे जनक डॉ. अशोक लढ्ढा, स्लॉफ़्ट प्रक्रिया तयार करणारे डॉ. डी. यू. पाठक, कोलोरेक्टल सर्जन व वैद्यकीय लेखक डॉ. अजित कुकरेजा, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जयपूरचे डीन डॉ. हेमंत कुमार यांचा सहभाग होता. याशिवाय डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डीन डॉ. अमर द्विवेदी, डॉ. मुकुल पटेल, डॉ. रविशंकर परवाजे, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. प्रवीण पाटील आणि डॉ. गजानन धाडवे हे प्रख्यात तज्ञही उपस्थित होते

